Sun, Jan 19, 2020 21:24होमपेज › Nashik › नाशिकः राजीवनगर वसाहतीत दोघांचा खून

नाशिकः राजीवनगर वसाहतीत दोघांचा खून

Published On: Dec 28 2017 1:55AM | Last Updated: Dec 28 2017 1:55AM

बुकमार्क करा
नाशिकः प्रतिनिधी

येथील राजीवनगरात आपआपसातील वादातून झालेल्या मारहाणीत दोन जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या वादाचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. देवा इगे (राजीवनगर) आणि दिनेश नीळकंट बिराजदार (गणेश चौक) या दोघांचा मृत्यू झाला आहे.  

घटनास्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. याबाबत आत्तापर्यंत दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. मृतदेह शवविवेच्छदनासाठी सरकारी दवाखान्यात नेण्यात आले आहेत. परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. परिमंडळ दोनच्या परिसरात ४ तासात ३ खून झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.