Thu, Aug 06, 2020 03:54होमपेज › Nashik › जळगाव : सलग सातव्या दिवशी कोरोनाची शंभरी

जळगाव : सलग सातव्या दिवशी कोरोनाची शंभरी

Last Updated: Jul 02 2020 9:06PM

संग्रहीत छायाचित्रजळगाव : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यात कोरोना रूग्णंची संख्या काही केल्या कमी होताना दिसत नाही. कोरोनामुळे बळी जाणाऱ्यांच्या आकड्यातही दिवसेंदिवस वाढ होत आहे. आज प्राप्त झालेल्या अहवालनुसार, सलग सातव्या दिवशीही कोरोनाने शंभरी पार केली. आज तब्बल १६८ रूग्ण सापडले असून बधितांची संख्या ३ हजार ७९८ इतकी झाली आहे. यात जळगाव ७९६ तर भुसावळ शहराने ४३५ चा आकडा गाठला आहे. 

जळगाव : हतनूर धरणाचे ३२ दरवाजे उघडले 

आजचा हा सलग सातवा दिवस असून आजही कोरोनाने शंभरी पार केली आहे. आज तब्बल १६८ कोरोनाबाधित सापडले असून ७ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत २४६ रुग्णांचा कोरोनामुळे बळी गेला मृत्यू झाला आहे. तर जिल्ह्यातीलच पण सध्या जिल्ह्याबाहेर उपचार घेत असलेले ९० पॉझिटिव्ह व ११ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यांची नोंद त्या त्या जिल्ह्यात करण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक व नोडल अधिकारी यांनी दिली आहे. 

जिल्ह्यात आज १६८ रूग्ण सापडले असून ते जळगाव शहर, अमळनेर, धरणगाव, एरंडोल, रावेर यावल या तालुक्यातील सर्वाधिक रूग्ण आहेत. जळगाव शहरात अजूनही कोरोनाचा धुमाकूळ सुरू आहे. याच्यासह नियमित ठिकाणी सुद्धा रुग्ण सापडले आहेत. यात चिंताजनक रूग्ण असलेल्या १५० जणांवर उपचार सुरू आहेत. यात माजी वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्या मतदार संघात कोरोनाने २०६ चा आकडा पार केला आहे.

जळगाव : 'त्या' कोरोनाबाधित डॉक्टर विरोधात गुन्हा

आज सापडलेले रूग्ण आणि जिल्हा 

जळगाव शहर २२, जळगाव ग्रामीण ८, अमळनेर १६, भुसावळ ३, भडगाव १, बोदवड ९, चाळीसगाव ५, चोपडा ९, धरणगाव १०, एरंडोल १९, जामनेर ४, मुक्ताईनगर ८, पाचोरा ५, पारोळा २, रावेर १६, यावल ३१ असे १६८ रूग्ण सापडले आहेत. 

एकूण कोरोना रूग्ण आणि जिल्हा 

जळगांव शहर ७९६, जळगाव ग्रामीण १३३, अमळनेर ३४२, भुसावळ ४३५, भडगाव २३४, बोदवड ८८, चाळीसगाव ५०, चोपडा २६३, धरणगाव १७७, एरंडोल १७७, जामनेर २०६, मुक्ताईनगर ४८, पाचोरा ९७, पारोळा २३०, रावेर २८४, यावल २२८ दुसऱ्या जिल्ह्यातील १० असे ३७९८ रूग्ण झाले आहेत.