Tue, Jul 14, 2020 11:49होमपेज › Nashik › जळगाव जिल्ह्यात नवे १४४ रुग्ण सापडले

जळगाव जिल्ह्यात नवे १४४ रुग्ण सापडले

Last Updated: Jun 30 2020 9:58PM
जळगाव : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यात रुग्णाची संख्या कमी होण्याची चिन्ह काही दिसत नाहीत. आज (दि. ३०) पुन्हा कोरोना रुग्णांनी शंभरी पार केली आहे. जिल्ह्यात १४४ रुग्ण सापडले आहे. तर १० जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्यातील कोरोना बधितांची संख्या ३५८२ झाली आहे.

आज मिळालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात १४४ कोरोना बाधित सापडले आहे. यात जिल्ह्यात १० रुग्णाचा मृत्यू झाला आहे, तर एकूण २४४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर कोरोना बधितांचा ३५०० चा आकडा पार केला आहे. यात ९० रुग्ण हे जिल्ह्याच्या बाहेर उपचार घेत आहे. तसेच आज मनपा क्षेत्रात २४ तर ग्रामीण व नगर पालिका भागात १२०रुग्ण सापडले आहेत.

यात आज जळगाव शहर, भडगाव, रावेर यावल या तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आहेत. जळगाव शहर २४, जळगाव ग्रामीण ५, अमळनेर २, भुसावळ १, भडगाव १९, बोदवड ७, चाळीसगाव ४, चोपडा ११, धरणगाव ६, एरंडोल १, जामनेर ११, मुक्ताईनगर ९, पाचोरा ४, पारोळा ८, रावेर १३, यावल १९, दुसऱ्या जिल्ह्यातील १० असे एकूण १४४ रुग्ण सापडले आहे.