Wed, Jan 27, 2021 09:07होमपेज › Nashik › आमदार, पदाधिकारी भाजपाचे इच्छुक

आमदार, पदाधिकारी भाजपाचे इच्छुक

Published On: Sep 05 2019 1:42AM | Last Updated: Sep 05 2019 12:15AM
नाशिक : प्रतिनिधी 

विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या भाजपा उमेदवारांच्या मुलाखती भाजपाच्या वसंतस्मृती कार्यालयात बुधवारी (दि.4) पार पडल्या. नाशिक शहरासह जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघात विद्यमान आमदारांसह 12 ते 15 इच्छुक उमेदवार असल्याने अंतिम उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब करताना पक्षश्रेष्ठींची कसोटीच लागणार आहे. कारण इच्छुकांमध्ये अनेकजण पक्षाचे बडे पदाधिकारी आहेत. यामुळे विद्यमान आमदारांनाही घाम फुटला आहे. नगरविकास राज्यमंत्री तथा नाशिक विधानसभेचे निरीक्षक योगश सागर यांच्या उपस्थितीत मुलाखती झाल्या. 

केंद्र व राज्य सरकारच्या चांगल्या कामगिरीमुळे प्रत्येक विधानसभा मतदार संघात अनेकजण निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचे पहावयास मिळत असल्याचे शहराध्यक्ष गिरीश पालवे यांनी यावेळी सांगितले. तत्पूर्वी कोअर कमिटीची बैठक नाशिक विधानसभा निरीक्षक योगश सागर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. बैठकीस प्रदेश उपाध्यक्ष वसंत गिते, सुनील बागूल, प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी, शहराध्यक्ष गिरीष पालवे, संघटन सरचिटणीस प्रशांत जाधव, सरचिटणीस पवन भगुरकर, काशिनाथ शिलेदार, उत्तम उगले, संभाजी मोरुस्कर, आमदार बाळासाहेब सानप, आमदार सीमा हिरे, आमदार देवयानी फरांदे, महापौर रंजना भानसी, सभागृह नेता सतीश  सोनवणे, गटनेता जगदीश पाटील उपस्थित होते.

सकाळी नाशिक शहराशी संबंधित मध्य, पूर्व, पश्चिम व देवळाली या चारही मतदार संघातील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यानंतर ग्रामीण विभागातील मतदार संघाच्या उमेदवारांच्या मुलाखती झाल्या. मुलाखतीत उमेदवाचे नाव, वय, शिक्षण, सध्या असलेले पद, किती वर्षापासून भाजपाचे सदस्य आहे, विधानसभा मतदार संघातील कामकाज, मतदार संघातील लोकसंख्या, गेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत पक्षाला पडलेले मतदान, भाजपा सदस्य नोंदणी अभियानात केलेली कामगिरी यासह विविध प्रकारची माहिती मुलाखतीत विचारली जात होती. तसेच लेखी अर्जही इच्छुकांकडून भरून घेतला गेला. 

मतदार संघनिहाय मुलाखती दिलेल्या इच्छुकांची नावे अशी : 

नाशिक पूर्व- आमदार बाळासाहेब सानप, सुनील केदार, अरुण पवार, उध्दव निमसे, स्वामी प्रा. डॉ. तुळशीरामजी गुट्टे, हेमंत धात्रक, उत्तम उगले, कमलेश बोडके, सुनील आडके, दिनकर आढाव, अ‍ॅड. मुकुंद आढाव, कांचन खाडे, बाळासाहेब पालवे, संभाजी मोरुस्कर, दामोदर मानकर, जगदीश गोडसे

नाशिक मध्य - आमदार देवयानी फरांदे, लक्ष्मण सावजी, वसंत गिते, आशिष नहार, विजय साने, सुरेश पाटील, हिमगौरी आहेर-आडके, शिवाजी गांगुर्डे, गणेश कांबळे, कुणाल वाघ, सुनील खोडे
नाशिक पश्चिम- आमदार सीमा हिरे, प्रदीप पेशकार, दिनकर पाटील, शशिकांत जाधव, कैलास आहिरे, अलका आहिरे, अनिल जाधव, सतिष सोनवणे, बाळासाहेब पाटील,  प्रशांत कोतकर, विक्रम नागरे, मुकेश शहाणे, निर्मला पवार, मयुर अलई, जगन पाटील, दिलीप भामरे, छाया देवांग.

देवळाली संघ- संपत जाधव, भगवान दोंदे, सरोज अहिरे, कुणाल वाघ, प्रितम आढाव, सुरेश बर्वे, अंबादास पगारे, अ‍ॅड. शाम बडोदे.