Tue, May 26, 2020 11:45होमपेज › Nashik › सेवक आहे, सेवकच राहणार, पुन्हा एकदा संधी द्या : मुख्यमंत्र्यांचे आवाहन (Video)

सेवक आहे, सेवकच राहणार, पुन्हा एकदा संधी द्या : मुख्यमंत्र्यांचे आवाहन (Video)

Published On: Sep 19 2019 2:16PM | Last Updated: Sep 19 2019 2:16PM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसनाशिक : प्रतिनिधी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाजनादेश यात्रेचा समारोप आज नाशकातून होत आहे. या समारोपासाठी  तसेच आगामी विधानसभेच्या प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशकात दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे २०१४ मध्येही भाजपने नाशकातून विधानसभेच्या प्रचाराचा नारळ फोडला होता. 

यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलय यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार स्तुतीसुमने उधळताना त्यांनी घेतलेल्या निर्णयाचे कौतुक केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रेला मिळालेला प्रतिसाद अभूतपूर्व असल्याचे सांगितले. पीएम मोदींनी पाच वर्ष काम करण्यास संधी दिल्याबद्दल आभार मानले. प्रत्येक बाबतीत महाराष्ट्र आघाडीवर असल्याचा दावाही त्यांनी केला. सेवक आहे, सेवकच राहणार, पुन्हा एकदा संधी द्या असे मुख्यमंत्र्यांनी आवाहन केले.  

या जाहीर सभेसाठी व्यासपीठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी खासदार उदयनराजे भोसले, मंत्री विनोद तावडे, आशिष शेलार, पंकजा मुंडे, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, रामदास आठवले तसेच जय कुमार रावल, सुभाष भामरे, सुधीर मुनगंटीवार तसेच एकनाथ खडसे, राधाकृष्ण विखे पाटील, रक्षा खडसे, देवयानी फरांदे, महापौर रंजना भानशी आदी उपस्थित आहेत.