Fri, Jun 05, 2020 14:07होमपेज › Nashik › पहिल्याच दिवशी तुकाराम मुंढेंचा सिक्सर

पहिल्याच दिवशी तुकाराम मुंढेंचा सिक्सर

Published On: Feb 09 2018 5:03PM | Last Updated: Feb 09 2018 5:15PMनाशिक : पुढारी ऑनलाईन

तुकाराम मुंढे यांनी आज (दि.9) सकाळी बरोब्बर दहाच्या ठोक्याला महापालिकेत हजेरी लावत आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला. पालिकेत हजर झाल्यानंतर काहीच वेळात त्यांनी विविध कक्ष व कार्यालयांची पाहणी करत खातेप्रमुखांची बैठक घेतली. या आढावा बैठकीत मुंढे यांच्या पहिल्याच दिवसाच्या दणक्याने अन्य अधिकारी व कर्मचार्‍यांनाही घाम फोडला.

वाचा बातमी : आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आगमनालाच फोडला घाम

आज दुपारी तुकाराम मुंढे यांची नाशिकचे आयुक्त म्हणून पहिलीच पत्रकार परिषद घेतली. आजचा पहिला दिवस म्हणजे फक्त ओळख परेड आणि हलक्या फुलक्या कामांत न घालवता मुंढेंनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. तसेच सायंकाळच्यावेळी ते शहरातील विविध हॉटेल्स आणि दुकानांची पाहणी करणार असल्याचे मुंढे म्हणाले. यावेळी नाशिक शहराला स्वच्छ आणि सुंदर बनवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही ते म्हणाले. 

काय म्हणाले तुकाराम मुंढे

>नाशिकच्या विकासाबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. 

>ऑनलाईन सेवा देण्यासाठी प्रयत्न करणार

>संवेदनशीलतेसह पारदर्शकता जपण्याचा प्रयत्न

>शहरातील वाहतुक व्यवस्थेचा अभ्यास करणार

>बदलीबद्दल मी काही बोलणार नाही; चांगले काम करत राहणार

>शहरात सध्या कोणती कामे होणे गरजेचे आहे. याचा अभ्यास करून खरच ते गरजेचे आहे का? गरजेचे असल्यास त्याला तांत्रिक आणि आर्थिक सपोर्ट देण्याचा प्रयत्न

>डिएसआर रेटच्या वर कोणतेही टेंडर जाणार नाही

>गरज नसलेल्या कामांवर अभ्यास करून निर्णय घेणार 

>अधिकाऱ्यांना फक्त एकच सूचना  आहे की ज्याचं त्याचं काम त्यानेच करावं, मी कामाच्या गुणवत्तेत कुठेही तडजोड करत नाही. 

>कंत्राटदारांनी फाईल फिरवण्याची कामे करू नयेत. 

>पारदर्शक कामे करावीत, हॅन्की पॅन्की चालणार नाही ; भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना सल्ला 

>जो काम चांगले व पारदर्शक करतो त्याला १०० टक्के सुरक्षा आहे. पण, जो कामात दिरंगाई करतो त्याला त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल. 

>स्वच्छताही मनातून ठेवता आली पाहिजे, जो कचरा करतो त्यालाच तो साफ करावा असे वाटले पाहिजे.