Sun, Jun 07, 2020 11:50होमपेज › Nashik › नंदुरबार : गळफास घेतलेल्या अवस्थेत युवक-युवती आढळल्याने खळबळ

नंदुरबार : गळफास घेतलेल्या अवस्थेत युवक-युवती आढळल्याने खळबळ

Published On: Feb 28 2019 7:59PM | Last Updated: Feb 28 2019 8:03PM
नंदुरबार : प्रतिनिधी

नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यात गौऱ्या या गावात झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत युवक आणि युवतीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार धडगाव तालुक्यातील गौऱ्या गावात आज, २८ फेब्रुवारी रोजी सकाळी एका टेकडीवर झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत एक युवक आणि एक युवती आढळून आली.

मृत युवकाचे नाव दिनेश गोटया पावरा (वय २५) आणि मयत युवतीचे नाव कवित्री झिंग्या पावरा (वय २१) असे आहे. हे प्रेमीयुगुल असावे असा अंदाज लावला जात आहे.  दरम्यान हा खून आहे की आत्महत्या यावरही उलट- सुलट चर्चा सुरु झाली आहे. पोलिसांनी जळगाव पोलिस ठाण्यात अकस्‍मित मृत्यूची नोंद करून दोन्ही मृतदेहांचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी पाठविले आहेत.