Tue, Jun 02, 2020 22:10होमपेज › Nashik › वेळापूर येथे पालखेड डावा कालवा फुटला

वेळापूर येथे पालखेड डावा कालवा फुटला

Published On: Aug 15 2019 1:55PM | Last Updated: Aug 15 2019 1:48PM

वेळापूर येथे पालखेड डावा कालवा फुटल्‍याचे दृश.लासलगाव (नाशिक) : वार्ताहर 

लासलगाव जवळील वेळापूर येथील पालखेड डावा कालवा फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी झाल्याचे दिसून आले. पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने कालवा फुटल्याचे येथील नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.

वेळापूर येथील पालवे वस्ती जवळ असलेल्या पालखेड डाव्या कालव्याला सकाळी सात वाजेच्या दरम्यान भगदाड पडल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह सुरू झाला. कालवा फुटल्याची माहिती मिळताच विशाल पालवे  आणि वेळापूर येथील नागरिकांनी वेळीच धाव घेत कालव्यातील पाणी जवळच असलेल्या नदीमध्ये सोडून पाण्याचा प्रवाह कमी केला. भगदाड पडलेल्या ठिकाणी झाडे आणि दगडाच्या साह्याने पाण्याची गळती थांबविण्यात यश आले आहे मात्र येथून जाण्याचा रस्ता पूर्णतः बंद झाला आहे. याबाबत पाटबंधारे अधिकाऱ्यांना माहिती मिळताच त्यांनी तात्काळ वेळापूर येथे भेट देवून माहिती घेतली.