Fri, Jun 05, 2020 15:23
    ब्रेकिंग    होमपेज › Nashik › लासलगावमध्ये महावितरणाचा भोंगळ कारभार

लासलगावमध्ये महावितरणाचा भोंगळ कारभार

Published On: Sep 20 2019 11:48AM | Last Updated: Sep 20 2019 11:48AM

संग्रहित छायाचित्रलासलगाव (नाशिक) : वार्ताहर 

गेल्या अनेक दिवसांपासून येथील पाटील गल्ली, धनगर गल्ली, किल्ल्या मागील भागात रात्री  सात तास लाईट जाते तर कधी लाईट डीम असते. त्यामुळे परीक्षा चालू असताना विद्यार्थ्यांना होणारा वाचनासाठीचा त्रास, गृहिणींना होणारा त्रास यावर कोणीही बोलण्यास तयार नाही. आज  (ता.२०) पहाटेपासून तीन वाजल्यापासून जवळपास सात तास उलटले तरी अद्याप या परिसरात खंडित झालेला वीज पुरवठा सुरु न झाल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे.

लासलगाव, पिपळगाव, चांदवड आणि ओझर येथील देखभालीचे काम हे एकाच ठेकेदाराकडे असल्याने देखभाल आणि दुरुस्तीला वेळ लागत आहे. अपूरे  आणि कौशल्यहीन मनुष्यबळ आणि नियोजन शून्य कारभाराचा फटका हा नागरिकांना बसत आहे. त्यामुळे पाटील गल्ली व परिसरातील नागरिकांना ७  तासांहून अधिक येथील नागरिकांना अंधारात काढावे लागले.

महावितरण कंपनीचे फोन असून अडचण आणि नसून खोळंबा

महावितरणाची बत्ती गुल झाल्यास ग्राहकांनी केव्हाही फोन केल्यास फोन अस्तित्वात नाही, असा संदेश येतो. महावितरणचे कर्मचारी फोन बाजूला ठेवून देते असल्याचे ग्राहकांचे म्हणे आहे. त्यामुळे हा फोन असून असून अडचण आणि नसून खोळंबा झाला आहे.

मान्सूनमध्ये ग्राहकांना अखंडित वीज मिळावी यासाठी महावितरणच्या वतीने दर मॉन्सूनपूर्व दुरुस्तीची कामे केली आहेत. मात्र, त्यानंतरही  पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या तरी शहरातील वीजपुरवठा खंडित होत आहे. चांगली सेवा देण्यास महावितरण अपयशी ठरत असून त्याचा फटका प्रामाणिक वीज ग्राहकांना बसत आहे. याकडे महावितरण प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी सर्वसामान्य वीज ग्राहक करत आहे.

पावसाळ्यामध्ये अखंड वीजपुरवठा करता यावा, यासाठी महावितरणकडून पावसाळ्यापूर्वी कामे करण्यात येतात. वीजवाहिन्यांची तपासणी केली जाते. मात्र, प्रत्यक्षात महावितरणचा हा दावा फोल ठरला आहे