Fri, Jun 05, 2020 17:49होमपेज › Nashik › छगन भुजबळांंनी दाखल केला उमेदवारी अर्ज

छगन भुजबळांंनी दाखल केला उमेदवारी अर्ज

Published On: Oct 04 2019 1:48PM | Last Updated: Oct 04 2019 1:48PM

 नाशिक :  छगन भुजबळांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला.येवला : प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस आणि मित्रपक्ष आघाडीचे येवला विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आज (ता.०४) भव्य रॅली काढली. शक्तीप्रदर्शनाने त्यांनी येवला विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. 

तत्पूर्वी, सकाळी त्यांच्या पत्नी मीनाताई भुजबळ यांच्यासह कुटुंबातील महिलांनी त्यांचे औक्षण केले. यावेळी मोठा जनसमुदायाच्या उपस्थितीत रॅली काढण्यात आली. अर्ज दाखल करण्यापूर्वी त्यांनी शहरातील विविध महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. रॅलीमध्ये राष्ट्रवादीच्या झेंड्यासह शिवप्रतिमा असलेले भगवे झेंडे सुद्धा होते.

छगन  भुजबळ  हे महाराष्‍ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक प्रमुख नेते आहेत. भुजबळांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात शिवसेना या राजकीय पक्षातून केली. १९९१ साली त्यांनी शिवसेना सोडून काँग्रेस पक्षात प्रवेश केला. १९९९ मध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केल्यानंतर भुजबळ त्या पक्षात आले आणि त्या पक्षात एक नेता बनले.

आज विधानसभेसाठी अर्ज भरण्‍याची शेवटचा दिवस आहे. महाराष्‍ट्रातील विधानसभा मतदारसंघात अर्ज भरण्‍याची शेवटचा दिवस असल्‍याने गर्दी पाहायला मिळणार आहे.