Sat, May 30, 2020 02:22होमपेज › Mumbai-Thane-Raigad › लेखिका सई परांजपे यांना साहित्य अकादमी भाषांतर पुरस्कार जाहीर 

लेखिका सई परांजपे यांना साहित्य अकादमी भाषांतर पुरस्कार जाहीर 

Last Updated: Feb 25 2020 1:44AM

लेखिका सई परांजपेनवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

ज्येष्ठ सिनेअभिनेते नसीरूद्दीन शाह यांच्या 'अँड देन वन डे ' ( And Then One Day ) या आत्मचरित्राचा मराठी अनुवाद  करणाऱ्या प्रसिद्ध लेखिका सई परांजपे यांना 2019 वर्षाचा भाषांतर पुरस्कार जाहीर झाला आहे. 

वाचा : कर्ज फिटले साहेब, आता लेकीच्या लग्नाला या..!; शेतकर्‍याचे मुख्यमंत्र्यांना निमंत्रण

साहित्य अकादमीचे सचिव डॉ . के . श्रीनिवासराव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे देशातील 23 प्रादेशिक भाषांतील विविध साहित्य प्रकारातील सर्वोत्कृष्ट अनुवादित साहित्यकृती व लेखकांच्या नावांची घोषणा सोमवारी केली. ज्येष्ठ पटकथाकार तथा दिग्दर्शक सई परांजपे यांचे 'आणि मग एक दिवस ' हे पुस्तक मराठी भाषेतील सर्वोत्कृष्ट अनुवादित पुस्तक म्हणून निवडण्यात आले आहे.

वाचा : रेल्वे'पाठोपाठ 'एसटी'च्याही भरतीचा बनावट मेसेज व्हायरल

पुरस्काराचे स्वरूप 50 हजार रूपये , ताम्रपत्र असे आहे. मराठी अनुवाद साहित्यातील पुस्तक निवड समितीमध्ये ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे, जयंत पवार, निशिकांत ठकार यांचा समावेश होता.