Fri, Jul 10, 2020 00:12होमपेज › Mumbai-Thane-Raigad › रायगड : कामगार बांधवांसाठी मौन सत्याग्रह

रायगड : कामगार बांधवांसाठी मौन सत्याग्रह

Last Updated: Jun 01 2020 4:40PM
रायगड : पुढारी वृत्तसेवा

कोरोनाने देशात थैमान घातले आहे. आज देशभरात लॉकडाऊनमुळे हलाखीच्या परिस्थितीत असणाऱ्या कामगार बांधवांसाठी मौन सत्याग्रह केला जात आहे. पायाला पडलेल्या भेगा, ठेचाळलेली मने, निराधार झालेली चिमणी मुले, न भागणारी भुक, बेरोजगारी, या सर्व हालांना सामोरा जात आहे.

देश घडवणारा कामगार वर्ग मध्यम आणि वरच्या वर्गांना सुख, ऐषाराम मिळावा यासाठी घरे बांधणारा, रस्ते, पूल, धरणे उभारताना स्वत: चे आयुष्य झिजवणारा हा कारागीर वर्ग, आपल्या सुखसोयी दारापर्यंत आणण्यासाठी खस्ता खाणारा फेरीवाला, व देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात भरीव योगदान देणाऱ्या या वर्गाप्रति सन्मान, कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सत्याग्रह देशातील सत्ताधाऱ्यांना सवाल विचारण्यासाठी करण्यात येत आहे. जनतेप्रति उत्तरदायी बनवण्यासाठी हा सत्याग्रह देशातील वीस राज्यातील लोक या सत्याग्रहात सहभागी झाले आहेत.

वाचा :आणि उध्दव ठाकरेंनी मानले सलमानचे आभार