Sun, Aug 09, 2020 01:52होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मंत्रालयाच्या सहाव्या मजल्‍यावरून महिलेची उडी (video)

मंत्रालयाच्या सहाव्या मजल्‍यावरून महिलेची उडी (video)

Last Updated: Dec 13 2019 7:29PM
मुंबई : प्रतिनिधी 

शासकीय कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी सध्या शिक्षा भोगत असलेल्या पतीच्या सोडवणूकीसाठी उल्हासनगर येथील एका महिलेने मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र मंत्रालयात लावलेल्या संरक्षण जाळीमुळे सदर महिला बचावली. मात्र या प्रकारामुळे प्रशासनाची चांगलीच पळापळ झाली. 

या विषयी अधिक माहिती अशी की, उल्हासनगर येथील रहिवाशी असलेली प्रियंका अजय गुप्ता या महिलेच्या पतीवर आयपीसी ३५३ अन्वये गुन्हा दाखल आहे. त्‍यामुळे सध्या तुरूंगात शिक्षा भोगत आहे. त्‍यामुळे आपल्‍या पतीला तुरूंगातून सोडावे या मागणीसाठी या महिलेने हे कृत्य केल्याची माहिती मंत्रालयातील पोलिसांनी दिली.
या महिलेला मंत्रालयात तैनात असलेल्या पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पुढील उपचारासाठी तीला सीएसएमटी येथील सेंट जॉर्ज हॉस्पिटल येथे नेण्यात आले आहे.