Wed, Apr 01, 2020 07:56होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पदवीच्या गुणपत्रिकेवर आता ग्रेडबरोबर टक्केवारीही देणार

पदवीच्या गुणपत्रिकेवर आता ग्रेडबरोबर टक्केवारीही देणार

Last Updated: Feb 22 2020 2:28AM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा
राज्यातील विद्यापीठातून पदवी अभ्यासक्रमांचा निकाल जाहीर झाल्यानंतर  देण्यात येणार्‍या गुणपत्रिका विद्यापीठे आपल्या स्तरावर वेगवेगळ्या नमुन्यात दिल्या जातात त्यामुळे व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. 

राज्यातील सर्व विद्यापीठांच्या गुणपत्रिका एकाच नमुण्यात आणि ग्रेडसह टक्केवारी देण्याच्या सूचना विद्यापीठांना देण्यात आल्या असून यासंदर्भातील अंमलबजावणी यंदापासूनच केली जाईल, असे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

राज्यातील अकृषी विद्यापीठातून पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थी राज्यभरात   व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेण्यासाठी प्रयत्न करत असतात, हे प्रवेश सीईटी सेलच्या माध्यमातून दिले जातात. 

सीईटी सेलच्या माध्यमातून होणार्‍या व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया एक आणि गुणपत्रिका वेगवेगळ्या नमुण्यात यामुळे मोठ्या गोंधळाला सामोरे जावे लागते. प्रवेशाची गुणवत्ता यादी काढताना अनेक अडचणी तयार होतात. एका विद्यापीठाकडून ग्रेड आणि दुसर्‍या विद्यापीठाकडून गुण टक्केवारी अशा नमुन्यात प्रवेश प्रक्रियेवर मोठा ताण येतो. 

या अडचणी दूर करण्यासाठी राज्यातील विद्यापीठांना एकाच नमुन्यात प्रश्?नपत्रिका देण्याचे आदेश दिले असून त्यासंदर्भात कुलगुरुंची एक बैठक घेवून या संदर्भात योग्य त्या सूचना दिल्या जातील असेही उच्च व तंत्रशिक्षणमंत्री सामंत यांनी स्पष्ट केले. 

विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर ग्रेड बरोबर त्या विषयांची टक्केवारी देण्याचीही सक्?ती विद्यापीठांना असेल. विद्यापीठांनी विद्यार्थ्यांना पदवी पूर्ण केल्यानंतर इतर ठिकाणी प्रवेशासाठी जाताना त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होवू नये याची खबरदारीही विद्यापीठांना घ्यावी लागेल असेही ते म्हणाले.