Fri, Apr 23, 2021 13:45होमपेज › Mumbai-Thane-Raigad › जीव वाचवणाऱ्या देवदुतांना बळ द्या! डॉक्टर, कर्मचाऱ्यांना घर सोडायला सांगितल्यास कडक कारवाई

जीव वाचवणाऱ्या देवदुतांना बळ द्या! डॉक्टर, कर्मचाऱ्यांना घर सोडायला सांगितल्यास कडक कारवाई

Last Updated: Mar 26 2020 1:15PM

राज्य सरकारचे परिपत्रकमुंबई : पुढारी वृत्तसेवा

राज्यात काही ठिकाणी डॉक्टर, नर्सिंग कर्मचारी आणि इतर आरोग्य कर्मचारी यांना कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संबंधित घरमालक किंवा हाऊसिंग सोसायट्या घर सोडून जाण्यास सांगत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. मानवतेच्यादृष्टीने तर हे अत्यंत चुकीचे आहेच. परंतु नियमबाह्यही आहे. घरमालकांनी आणि सोसायट्यांनी आरोग्य यंत्रणेचे महत्व लक्षात घेऊन सहकार्य करावे. अन्यथा साथरोग नियंत्रण कायद्यानुसार संबंधित घरमालक किंवा हाऊसिंग सोसायटीवर कारवाई करण्यात येईल, असे सरकारने प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे. 

वाचा - ससूनची नवीन इमारत झाली कोविड-१९हॉस्पिटल

सध्या करोना विषाणु साथीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील डॉक्टर, नर्सिंग, कर्मचारी आणि इतर आरोग्य कर्मचारी अत्यंत महत्वाची भूमिका बजावत आहेत. हे करताना त्यांना विषाणूची बाधा होऊ नये यासाठी आवश्यक ती सर्व काळजी त्यांच्यामार्फत तसेच प्रशासनामार्फत घेतली जात आहे. त्यामुळे त्यांच्याकडून इतरांना संसर्गाचा कोणताही धोका नाही. असे असतानाही काही घरमालक, हाऊसिंग सोसायट्या त्यांच्याकडे भाड्याने राहणारे डॉक्टर, नर्सिंग कर्मचारी आणि इतर आरोग्य कर्मचारी यांना घर खाली करण्यास सांगत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. हे पूर्णतः चुकीचे असून संबंधित घरमालक, हाऊसिंग सोसायट्या यांनी असे करू नये, असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

वाचा - इंद्रायणी घाटावर अडकले ३०० लोक

एखादे घरमालक किंवा हाऊसिंग सोसायटी असे करत असल्याचे निदर्शनास आल्यास साथरोग नियंत्रण कायद्यानुसार त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल, असे प्रशासनामार्फत कळविण्यात आले आहे. भाड्याच्या घरात राहणारे डॉक्टर, नर्सिंग कर्मचारी आणि इतर आरोग्य कर्मचारी यांना असा अनुभव आल्यास त्यांनी आपल्या क्षेत्रातील पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.