Sun, Mar 29, 2020 08:31होमपेज › Mumbai-Thane-Raigad › व्हॉट्सॲपमध्ये आतापर्यंतचे सर्वांत हटके फिचर!

व्हॉट्सॲपमध्ये आतापर्यंतचे सर्वांत हटके फिचर!

Last Updated: Mar 04 2020 11:05AM

संग्रहित छायाचित्रनवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

व्हॉट्सॲप यूझर्ससाठी सर्वात चांगली बातमी आहे. दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर कंपनीने अँड्रॉइड आणि आयओएसच्या सर्व यूझर्ससाठी डार्क मोड आणला आहे. हे गेल्या अनेक महिन्यांपासून बीटा चाचणीत होते. डार्क मोडचे सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे चॅट करताना डोळ्यांना त्रास होत नाही. याव्यतिरिक्त, डार्क मोड फोनच्या स्क्रीनमधून उत्सर्जित होणारा प्रकाश देखील कमी करते, ज्यामुळे फोनची बॅटरी देखील कमी खर्च होते. 

अधिक वाचा : आता मध्य प्रदेशात कर'नाटकी' अध्यायाचा दुसरा अंक सुरु

डार्क मोडविषयी व्हॉट्सअ‍ॅपने सांगितले की, 'चाचणी दरम्यान आम्हाला असे आढळले की शुद्ध पांढर्‍या आणि काळा रंगाच्या रंगाच्या संयोजनामुळे डोळ्यांना लवकर थकवा येतो. म्हणूनच आता आपल्याला व्हॉट्सअ‍ॅपवर एक खास डार्क ग्रे बॅकग्राऊंडला ऑफ-व्हाइट रंग दिसेल, ज्यामुळे स्क्रीनवरील ब्राईटनेस कमी होतो त्याचबरोबर कॉन्ट्रास्टमध्येही सुधारणा झाली आहे. डार्क मोडमध्ये चॅट करणे पूर्वीपेक्षा खूप चांगला अनुभव देईल.

अधिक वाचा : तारक मेहता वाद; 'या' अभिनेत्याचा माफीनामा

यूझर्स त्यांच्या गरजेनुसार डार्क मोड चालू आणि बंद देखील करू शकतात. डार्क मोडवर ब्लॅक बॅकग्राऊंडमध्ये डार्क ग्रे टेक्स्ट दिसून येतात. यापूर्वी व्हॉट्सअॅपची बॅकग्राऊंड व्हाईट आणि टेक्स्ट डार्क कलरमध्ये होते. त्यामुळे यूझर्सना त्रास होत होता, पण डार्क मोडमध्ये तसे होणार नाही. 

Android 10 आणि iOS 13 यूझर्स डायरेक्ट सिस्टम सेटिंग्जमध्ये जाऊन डार्क मोड ॲक्टीव्हेट करू शकतात. त्याच वेळी, अँड्रॉइड 9 आणि जुन्या ओएस यूझर्सनी व्हॉट्सअॅप चॅटवर जाऊन थीम पर्यायावर टॅप करावे लागेल. त्यासाठी व्हॉट्सअॅप लेटेस्ट व्हर्जन अपडेट करावे लागेल. 

अधिक वाचा : अबब..! ५० पर्यंत पाढे पाठ, तेही उलट-सुलट!