Tue, Jun 15, 2021 12:27
येत्या पाच दिवसात या जिल्ह्यात पडणार मुसळधार पाऊस 

Last Updated: Jun 11 2021 7:26PM

file photo
मुंबई पुढारी ऑनलाईन : पुढील पाच दिवसांमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर मध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हा इशारा हवामान विभागाने दिला आहे. याचबरोबर पुढील पाच दिवसांमध्ये कोकणातील जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अशी माहिती हवामानतज्ज्ञ के. एस.होसाळीकर यांनी ट्विट वरुन दिली आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील पाच दिवसांसाठी हवामानाचा अंदाज जाहीर केला आहे. 

वाचा : नितीन गडकरींचे नाव सांगून सोनाराला गंडा  

मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, परभणी आणि लातूर, उस्मानाबाद मुसळधार पाऊस होऊ शकतो असा इशाराही दिला आहे. १ जून ते १५ जून पर्यंतचा पावसाचा अंदाज हवामान विभागाने जाहीर केला. यात ११ जून रोजी उत्तर कोकणातील रायगड जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. तर मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यातही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला. दक्षिण कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. 

 

Please read carefully the severe weather warnings issued by IMD to for Konkan region for coming 5 days, including Mumbai Thane ...
Need to be take seriously by all please as it could be one of the longest spell possibly!
Warnings are there for other parts of Mah too, Pl see pic.twitter.com/w0q1CSHE0r

— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 11, 2021

१२ जून रोजी उत्तर कोकणातील रायगड जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, जिल्ह्यातील काही ठिकाणीमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दक्षिण कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार आणि अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. 

१३ जून रोजी उत्तर कोकणातील मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पालघर जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी मुसळधार पावासाचा इशारा देण्यात आला आहे. दक्षिण कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार आणि अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. 

१४ जून रोजी उत्तर कोकणातील मुंबई, ठाणे आणि रायगड पालघर जिल्ह्यातील काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. १५ जून रोजी कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे आणि मुंबई, पालघरमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला  आहे. 

यावर्षी जून च्या पहिल्याच आठवड्यात पावसाने सुरुवात केली आहे. पश्चिम महाराष्ट्रात शेतकऱ्यांनी पेरणी करण्यास सुरुवात केली आहे. 

वाचा : WhatsApp वरुन पैसे कसे पाठवायचे?

वाचा : दिलीप कुमार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज