Fri, Nov 27, 2020 11:35होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘वॉक वुईथ वॉकरू’ सोशल कॉन्टेस्ट

‘वॉक वुईथ वॉकरू’ सोशल कॉन्टेस्ट

Last Updated: Nov 09 2020 2:38PM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा

कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर लोकांमध्ये व्यायाम तसेच आरोग्यदायी जीवनाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने प्रसिद्ध पादत्राणे ब्रँड वाकरूने ‘वॉक वुईथ वॉकरू’ ही अभिनव मोहीम हाती घेतली आहे.

‘वॉकरू’ला विश्‍वास आहे की, आरोग्यदायी जीवनाची सुरुवात ही घरातूनच होते. कोरोना महामारीच्या संकटामुळे आरोग्य किती महत्त्वपूर्ण आहे? याची जाणीव सर्वांनाच झाली. आरोग्यदायी, निरोगी जीवनाची गुरूकिल्‍ली म्हणजे व्यायाम आणि चालण्यासारखा उत्तम व्यायाम दुसरा कोणताच नाही, असे म्हटले जाते. लोकांमध्ये व्यायामाची आवड निर्माण व्हावी, यासाठी वाकरूने ‘वॉक वुईथ वॉकरू’ ही संकल्पना राबवली आणि लोकांना तंदुरुस्त आणि निरोगी होण्यासाठी प्रेरणा देण्याचा निर्णय घेतला.

‘वॉक वुईथ वॉकरू’ ही लोकांमध्ये आरोग्याविषयी जागृती करण्यासाठी राबविलेला सामाजिक उपक्रम आहे. 26 ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या या कॉन्टेस्टला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. 13 नोव्हेंबरपर्यंत ही कॉन्टेस्ट सुरू राहणार आहे. ही स्पर्धा सोमवार ते शुक्रवार लाईव्ह असते. यामध्ये सहभागी होण्यासाठी स्पर्धकांना कोणत्याही ट्रॅकर अ‍ॅपच्या सहाय्याने स्वत:चे स्टेप-काऊंट वाकरू ब्रँडच्या सोशल हँडल्सवर टॅग करायचे आहेत. सहभागी स्पर्धकांपैकी निवडक 10 स्पर्धकांना कंपनीचे नवीन शूज मोफत दिले जाणार आहेत.

या स्पर्धेला सुरुवात झाल्यापासून पहिल्या आठवड्यातच तब्बल 30 लाख सपर्धकांनी यात सहभाग नोंदवला आहे. या अभिनव कॉन्टेस्टला संपूर्ण भारतात मोठा प्रतिसाद मिळत आहे. तरी या कॉन्टेस्टमध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन ‘वॉकरू’तर्फे करण्यात आले आहे.