होमपेज › Mumbai-Thane-Raigad › वडाळ्यातील प्रतिपंढरपुरात विनोद तावडेंनी केली विठ्ठल-रखुमाईची पूजा (video)

वडाळ्यातील प्रतिपंढरपुरात विनोद तावडेंनी केली विठ्ठल-रखुमाईची पूजा (video)

Published On: Jul 12 2019 9:53AM | Last Updated: Jul 12 2019 9:53AM
मुंबई : प्रतिनिधी

आषाढी एकादशीनिमित्त पहाटेपासून वारकऱ्यांनी तसेच भक्तांनी विठ्ठल-रुक्मिनीच्या दर्शनासाठी विविध ठिकाणच्या मंदिरांमध्ये रांगा लावल्या आहेत. पंढरपुरात तर लाखो भाविकांसह मुख्यमंत्र्यांनी सपत्नीक विठुरायाचे दर्शन घेतले. त्याचबरोबर राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी पहाटे सपत्नीक वडाळ्यातील प्रतिपंढरपूर म्हणून ओळख असलेल्या विठ्ठल मंदिरात जाऊन विठ्ठल-रखुमाईची विधीवत पूजा केली.

यावेळी मंत्री तावडे यांनी महाराष्ट्राच्या कोटयवधी जनतेला सुखी, समृद्ध आणि निरोगी ठेव, अशी विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना केली.