Mon, Aug 03, 2020 14:50होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अखेर राहुल गांधींकडून राज्यात प्रचार सुरू होणार!

अखेर राहुल गांधींकडून राज्यात प्रचार सुरू होणार!

Last Updated: Oct 10 2019 5:47PM

राहुल गांधीमुंबई : प्रतिनिधी

अखिल भारतीय काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांची काँग्रेस-राष्ट्रवादी मित्र पक्षाच्या उमेदवार यांच्यासाठी धारावी येथे 13 ऑक्टोबरला सायंकाळी 4.30 वाजता  सभा होणार आहे. याचबरोबर अध्यक्षा सोनिया गांधी यांची ही सभा घेण्याचा विचार आहे, तर प्रियांका गांधी यांचा कुलाबा ते दहिसर असा रोड शो होणार आहे. याबाबतची माहिती मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांनी गुरुवारी मुंबई काँग्रेस भवन येथे पत्रकार परिषदेत दिली.

गायकवाड म्हणाले , विधानसभा निवडणुकीसाठी राहुल गांधी यांची मुंबई सह महाराष्ट्रत इतर ठिकाणी सभा होणार आहेत. रविवारी (दि.13) धारावी सभा आटोपून ते पुन्हा दिल्लीला विमानाने रवाना होणार आहेत. गांधी यांची सभा घेण्याची पदाधिकारी, कार्यकर्ते यांची मागणी होती. या सभेची जय्यत तयारी सुरू आहे. या सभेला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. राहुल गांधी हे विरोधकांवर सर्वच मुद्यांवर कडाडनार आहेत. त्यात महागाई, बेरोजगार, उधोगधंदे हे मुद्दे प्रामुख्याने असणार आहेत.