Sun, Sep 27, 2020 02:19होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अमृता फडणवीसांचं गाणं 'हे मले सैन नाही होत...'

अमृता फडणवीसांचं गाणं 'हे मले सैन नाही होत...'

Last Updated: Feb 16 2020 2:00AM
'व्हॅलेंटाईन डे'ला युझर्सनी केलं ट्रोल 

मुंबई : पुढारी ऑनलाईन   

माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने एक खास गाणं गायलं आहे. एक इंग्रजी गाण्याचा व्हिडिओ अमृता फडणवीस यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केला आहे. हे गाणं खूप सुंदर आणि सुरेल आवाजात त्यांनी गायलं आहे. असं असलं तरी नेटकऱ्यांनी मात्र त्यांना ट्रोल केलं आहे. 

अमृता फडणवीस यांनी व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने लोकप्रिय इंग्रजी गायक lionel richie चं गाणं आपल्या आवाजात गायलं. त्यांनी व्हॅलेंटाईन डेला हे गाणं रिलीज केलं होतं. lionel richie याने हे गाणं गायलं होतं. अमृता यांनी आपल्या आवाजात गायलेलं हे गाणं नेटकऱ्यांना आवडलं नाही. सोशल मीडियावर अनेक युजर्संनी अमृता यांच्या गाण्याची खिल्ली उडवली आहे. 

ट्विटरवर अमृता यांना ट्रोलर्सचा सामना करावा लागत आहे. एका युजरने म्हटले आहे 'हे मले सैन नाई होत.' 'नाळ' चित्रपटातील श्रीनिवासच्या फोटोसह हा डायलॉग स्क्रीनशॉट करून शेअर केला आहे. तर दुसऱ्या युझरने म्हटले आहे-'अमृता यांचे गाणं रानू मंडला यांच्यापेक्षा चांगलं आहे.' 

अमृता फडणवीस यांच्या आवाजातील हे गाणं पाहा -

Darkness cannot drive out darkness, only Light can do that ! Hate cannot drive out hate, only Love can do that ! Here's a cover version of my favourite song by @lionelrichie ! Njoy the whole song wth 💓 on 👉 https://t.co/NpunS8SXli #HappyValentinesDay #HappyValentinesDay2020 pic.twitter.com/cOQX3Mo36u

— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) February 14, 2020

मॅडम खरं सांगायचं तर तुमच्या सारख्या हिऱ्याची जागा हॉलिवूड मध्ये आहे...इथं महाराष्ट्रात तुमच्या गुणाची कदर नाही हो कोणाला🙏

— प्रो. धोंड (@amlya02) February 14, 2020

pic.twitter.com/MA93O2bkEI

— dimaagkoshot (@dimaagkoshot) February 14, 2020

pic.twitter.com/MA93O2bkEI

— dimaagkoshot (@dimaagkoshot) February 14, 2020
 "