Sun, Oct 25, 2020 07:38होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अजित पवारांनी 'ते' ट्विट तासाभरातचं केलं डिलीट!

अजित पवारांनी 'ते' ट्विट तासाभरातचं केलं डिलीट!

Last Updated: Sep 25 2020 3:18PM

उपमुख्यमंत्री अजित पवारमुंबई : पुढारी ऑनलाईन

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भारतीय जनसंघाचे सहसंस्थापक पंडित दिनदयाळ उपाध्याय यांच्या जंयतीनिमित्ताने त्यांना अभिवादन करणारे ट्विट केले होते. मात्र, काही वेळानंतर अजित पवारांनी हे ट्विट डिलीट केलं. त्यांनी ट्विट का डिलीट केलं, यावरुन राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

वाचा : कामगार कायद्यातील दुरुस्तीचा पहिला फटका; नाशिकमध्ये २० कामगारांना नोकरीवरुन काढलं!

सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास अजित पवारांनी पंडित दिनदयाळ उपाध्याय यांना ट्विटद्वारे अभिवादन केले होते. मात्र, काहीवेळातच हे ट्विट त्यांनी डिलीट केले. यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

वाचा : सोने खरेदीची सुवर्ण संधी; दरात मोठी घसरण

महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत येण्यापूर्वी अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत राजभवनावर भल्या पहाटे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर फडणवीस यांचे अल्पकाळाचे सरकार ठरले. 

वाचा : 'गुप्तेश्वर पांडे बिहारचे DGP होते, पण ते भाजप नेते असल्यासारखे बोलायचे'

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पंडित दिनदयाळ उपाध्याय यांना जयंतीनिमित्त पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केल आहे. याबाबतचे ट्विट मुख्यमंत्री कार्यालयाकडून करण्यात आले आहे.   

 "