Sat, Sep 19, 2020 07:53होमपेज › Mumbai-Thane-Raigad › युजीसीबरोबर चर्चा करूनच परीक्षा रद्द करण्याचा निर्णय: उदय सामंत

युजीसीबरोबर चर्चा करूनच परीक्षा रद्द करण्याचा निर्णय: उदय सामंत

Last Updated: Jul 09 2020 3:33PM
मुंबई: पुढारी ऑनलाईन

अंतिम वर्षाची परीक्षा घेण्यावरून युजीसी आणि राज्य सरकार यांच्यात संघर्ष पेटला आहे. युजीसीबरोबर चर्चा करूनच परीक्षा रद्द करण्याची निर्णय घेतल्याचा दावा उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केला आहे. सामंत यांनी युजीसीने प्रथम घेतलेला निर्णय फिरवल्याचा म्हटले आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी यासंदर्भात चर्चा केली असल्याची माहितीही सामंत यांनी दिली. 

विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा आणि आरोग्याचा विचार करूनच हा निर्णय घेतल्यो सामंत यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर राज्यातील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंशी सुद्धा चर्चा केली होती, असेही त्यांनी यावेळी नमुद केले. 

उदय सामंत म्हणाले

परीक्षा न घेण्यावर राज्यसरकार ठाम

महाराष्ट्रात सप्टेंबरपर्यंत परीक्षा घेण्याची परिस्थिती नाही 

३ महिन्यांपासून पत्रव्यवहार केला पण उत्तर आल नाही. 

परीक्षा न घेण्याबाबत युजीसीला पत्र लिहल

एटीकेटीच्या मुलांना पास कराव; कुलगुरूंची शासनाकडे शिफारस

शासनाची भूमिका ही प्रामाणिक भूमिका

 "