Fri, Apr 23, 2021 14:44
ट्यूशनला बोलवून प्रँकच्या नावाखाली प्रायव्हेट पार्ट्सना स्पर्श; १७ युट्यूब चॅनेल्सचा कारनामा!

Last Updated: Feb 27 2021 8:51PM

संग्रहित छायाचित्र
मुंबई : पुढारी ऑनलाईन 

ही सर्व पालकांसाठी बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. जे त्यांच्या मुलींना ट्युशनसाठी कोचिंग सेंटरमध्ये पाठवतात. मुंबईतील एका कोचिंग सेंटरचा पर्दाफाश झाला आहे. प्रँकच्य नावाखाली मुलींना बोलावले जात होते. नंतर त्याच व्हिडिओचे अश्लील व्हिडिओ केले जात होते. 

वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या माहितीनुसार अशा व्हिडिओंमध्ये आरोपी मुलींना १० ते १५ मिनिटांसाठी सार्वजनिक ठिकाणी घेऊन जात असत आणि संभाषणात त्यांच्या खासगी भागाला स्पर्श करत असत. एवढेच नव्हे तर या आरोपींनी या मुलींना तोंड न उघडण्याची धमकीही दिली होती. अशाच एका टोळीचा मुंबई पोलिसांनी ताब्या घेतले आहे. 

अधिक पैसे मिळवण्यासाठी फेसबुक आणि यूट्यूबवर अश्लील व्हिडिओ पोस्ट करणार्‍या तीन तरुणांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. गुन्हे शाखेचे (मुंबई क्राइम ब्रँच) प्रमुख मिलिंद भारंबे यांच्या म्हणण्यानुसार हे तरुण लोकांना चुकीची माहिती देऊन अश्लील व्हिडिओ बनवत असत. या तरुणांनी अनेक मुलींचे अश्लील व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर पोस्ट केले आणि मुलींना तोंड न उघडण्याची धमकीही दिली.

गुन्हे शाखेकडून सांगण्यात आले आहे की, तरूणी मुलींकडे प्रँक करण्याच्या नावाखाली बोलवून अश्लील कृत्य करण्यास भाग पाडत असत. याशिवाय अश्लील शब्दही वापरले गेले. गुन्हे शाखेच्या म्हणण्यानुसार फेसबुक आणि यूट्यूबवरील जवळपास १७ चॅनेल्सनी अशा व्हिडिओंद्वारे दोन कोटींची कमाई केली आहे. काही पीडित महिलांच्या तक्रारीनंतर गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. मिलिंद भारंबे म्हणाले की, सन २००८ मध्ये या प्रकरणातील मुख्य आरोपीही दहावीत प्रथम क्रमांकावर आला आहे. सध्या तो ट्यूशन घेत होता. अल्पवयीन मुलींना प्रँकमध्ये सामील होण्यासाठी भुलवून नंतर अश्लील व्हिडिओ करत होता. 

गुन्हे शाखेच्या म्हणण्यानुसार कोरोना कालावधीत अशा व्हिडिओंच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. जवळजवळ १७ युट्यूब चॅनेलवर असे ३०० पेक्षा जास्त अश्लील व्हिडिओ बनवले गेले आहेत. तिन्ही आरोपींना पोक्सो कायद्यांतर्गत अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी मुकेश गुप्ता असून तो २९ वर्षांचा आहे. या सर्व व्हिडिओंविषयी आपण यूट्यूब आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील अधिकाऱ्यांशी बोलू आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून सर्व व्हिडिओ डिलीट करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे मिलिंद भारंबे यांनी सांगितले.