Sat, Jul 04, 2020 14:36होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आतापर्यंतची सर्व चक्रीवादळे मुंबईपासून दूरच!

138 वर्षांनी चक्रीवादळ मुंबईकडे !

Last Updated: Jun 03 2020 1:04AM
मुंबई ः पुढारी डेस्क

‘निसर्ग’ चक्रीवादळाच्या इशार्‍यानंतर संपूर्ण पश्‍चिम किनारपट्टीवर सतर्कता बाळगण्यात येत आहे. विशेषतः मुंबईला बुधवारी 3 जून रोजी या वादळाचा धोका संभवतो, असा अंदाज वर्तवण्यात आल्यानंतर खबरदारी घेण्यात येत आहे. तथापि मुंबईचा इतिहास पाहता येथे गेल्या 138 वर्षांमध्ये कोणतेही चक्रीवादळ किनारपट्टीला थडकलेले नाही. मात्र सध्याचे हवामान वेगळे असल्यामुळे ‘निसर्ग’ चक्रीवादळाचा मुंबईवर परिणाम होऊ शकतो. 

‘निसर्ग’ चक्रीवादळाच्या इशार्‍यानंतर संपूर्ण पश्‍चिम किनारपट्टीवर सतर्कता बाळगण्यात येत आहे. विशेषतः मुंबईला बुधवारी 3 जून रोजी या वादळाचा धोका संभवतो, असा अंदाज वर्तवण्यात आल्यानंतर खबरदारी घेण्यात येत आहे. तथापि मुंबईचा इतिहास पाहता येथे गेल्या 138 वर्षांमध्ये कोणतेही चक्रीवादळ किनारपट्टीला थडकलेले नाही. मात्र सध्याचे हवामान वेगळे असल्यामुळे ‘निसर्ग’ चक्रीवादळाचा मुंबईवर परिणाम होऊ शकतो, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. 

अरबी समुद्रात असलेल्या मुंबईच्या विशिष्ट स्थानामुळे  अनेक प्रकारच्या वादळापासून किनारपट्टीचे संरक्षण झाले आहे. दरवर्षी सरासरी दोन वादळे मुंबईच्या किनारपट्टीला स्पर्शून जातात. याउलट परिस्थिती बंगालच्या उपसागराची आहे. या किनारपट्टीला आजपर्यंत अनेक वादळांनी तडाखा दिला आहे. अरबी समुद्रात ज्यावेळी वादळ घोंघावते त्यावेळी ते एकतर ओमानच्या पश्‍चिमेला जाते किंवा एडनच्या आखाताच्या दिशेने कूच करते. त्यातूनही वादळाची तीव्रता अधिक असेल तर ते गुजरातच्या उत्तरेला तडाखा देऊन जाते. 1998 साली उद्भवलेल्या वायू चक्रीवादळात हजारो लोक मृत्युमुखी पडले होते. 

अरबी समुद्रात वायव्य दिशेला असणार्‍या विशिष्ट वळणाच्या प्रवाहामुळे चक्रीवादळांचा प्रभाव कमी होतो, अशी माहिती मुंबई आयआयटीच्या मॅकेनिकल इंजिनिअरिंग विभागाचे प्राध्यापक श्रीधन बालसुब्रमण्यम यांनी दिली.

मान्सूनपूर्व वातावरणात अरबी समुद्रात प्रचंड दाबाचा पट्टा तयार होत असतो. तो अशा प्रकारच्या वादळांना अडथळा निर्माण करतो. त्यामुळे ही वादळे किनारपट्टीवर थडकत नाहीत, असे त्यांनी सांगितले. गेल्या काही वर्षांमध्ये चक्रीवादळांचा सर्वाधिक फटका केरळला बसला आहे. केरळच्या भूरचनेमुळे ही वादळे तेथे तडाखा देऊन जातात, असेही बालसुब्रमण्यम यांनी सांगितले. 

प्रिन्सस्टोन या संस्थेच्या अभ्यासानुसार अरबी समुद्रात वातावरणात बदल होत आहेत. त्यात चक्रीवादळांना पोषक ठरेल असे वातावरण तयार होत आहे. हिंदी महासागरात तयार झालेल्या 8 पैकी 5 चक्रीवादळांदरम्यान हा अनुभव आला आहे.