Thu, Jan 21, 2021 00:23होमपेज › Mumbai-Thane-Raigad › देशांतर्गत विमान प्रवासानंतर क्वारंटाईन करणार की नाही? मंत्रालयाने केला खुलासा!

देशांतर्गत विमान प्रवासानंतर क्वारंटाईन करणार की नाही? मंत्रालयाने केला खुलासा!

Last Updated: May 24 2020 1:29AM

संग्रहित छायाचित्रनवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

देशांतर्गत उड्डाणे सुरू करण्याच्या घोषणेदरम्यान नागरी विमान वाहतूक मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी या संबंधित नियमांवर मोठे विधान केले आहे. आरोग्य सेतु अ‍ॅपमध्ये प्रवाशांचा स्टेटस 'ग्रीन' असेल तर त्यांना क्वारंटाईनची गरज नसल्याचे त्यांनी सांगितले. शनिवारी त्यांनी देशांतर्गत उड्डाणाच्या नियमांशी संबंधित ऑनलाईन चर्चेत पुरी यांनी ही माहिती दिली. 

अधिक वाचा : 'आम्हाला महाराष्ट्रात जेवायला मिळाले पण उत्तर प्रदेशात काहीच नाही'

त्यांनी आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करण्यासाठी सुतोवाच केले. कोविड-१९ लॉकडाऊनमध्ये उड्डाण करत असलेल्या प्रवाशांना क्वारंटाईन करणे किंवा संस्थात्मक क्वारंटाईन शक्यता गृहित धरून विचारले असता त्यांनी सांगितले की, आरोग्य सेतु ॲपवर ग्रीन स्टेटस असणाऱ्या प्रवाश्यांना अलग ठेवण्याची गरज नाही असे मला वाटते.पुरी यांनी केंद्र सरकार ऑगस्टपूर्वी आंतरराष्ट्रीय विमानसेवा वाजवी संख्येने सुरू करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सांगितले.

देशांतर्गत उड्डाणे सुरू करण्याच्या घोषणेनंतर केरळ, कर्नाटक आणि आसामसह सहा राज्यांनी देशांतर्गत प्रवास करून आल्यानंतर त्या प्रवाशांना क्वारंटाईन करण्याची घोषणा केली आहे.  शनिवारी कर्नाटक सरकारने विषाणूमुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या राज्यांतून येणाऱ्या लोकांना सात दिवस क्वारंटाईन सेंटरमध्ये रहावे लागेल आणि घरात सात दिवस अलिप्त राहावे लागेल असे म्हटले आहे. तथापि, वृद्ध, टर्मिनल आजाराशी झुंज देणारे लोक, मुलं आणि गर्भवती महिलांना यातून सूट मिळणार आहे.

अधिक वाचा : सोनिया गांधींनी बोलावलेल्या बैठकीत विरोधकांचा केंद्र सरकारवर निशाणा; शरद पवार म्हणाले... 

मंत्र्यांनी येत्या ऑगस्ट महिन्यांपर्यंत आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक सुरु करण्याचे संकेत दिले. विमानसेवा कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला जाईल असेही त्यांनी नमूद केले. आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरु करण्यासाठी एअरलाईन्स  कंपन्या तयार असल्याचेही त्यांनी सांगितले.