Wed, Sep 23, 2020 01:13होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मोठी बातमी : कोरोनावरील लसीचे १५ ऑगस्टला लाँचिंग; क्लिनिकल ट्रायल सुरु

मोठी बातमी : कोरोनावरील लसीचे १५ ऑगस्टला लाँचिंग; क्लिनिकल ट्रायल सुरु

Last Updated: Jul 03 2020 12:57PM
नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

कोरोनावरील लसीचे येत्या 15 ऑगस्ट रोजी लाँचिंग करण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च अर्थात आयसीएमआरकडून शुक्रवारी देण्यात आली. कोरोनावरील लसीच्या विकासासाठी आयसीएमआरने भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेडसोबत करार केलेला आहे. 

वाचा : पीएम मोदींचा लडाख दौऱ्यातून चीनला कठोर संदेश

आयसीएमआर आणि भारत बायोटेक इंटरनॅशनल यांच्याकडून विकसित करण्यात येत असलेली लस ही पूर्णपणे देशी स्वरूपाची असणार आहे, अशी माहिती आयसीएमआरचे महासंचालक बलराम भार्गव यांनी दिली. आयसीएमआरच्या अखत्यारीतील पुणे येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीने सार्स-सीओव्ही-झेड विषाणूचे स्ट्रेन बाजूला काढले असून त्यावर लसीचा विकास केला जात आहे. लसीचे प्री क्लिनिकल तसेच क्लिनिकल विकासाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. 

वाचा : देशात कोरोनाची दुसरी लस तयार, लवकरच क्लिनिकल ट्रायल

लोकांना वापरण्यासाठी 15 ऑगस्ट रोजी लस लाँच करण्याचे आयसीएमआरचे उद्दिष्ट आहे. कोरोनाचा वाढता प्रकोप लक्षात घेऊन लवकरात लवकर लस बाजारात आणण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे भार्गव यांनी नमूद केले. ओडिशामधील एका संस्थेसह देशभरातील 12 संस्थांमध्ये कोरोनावरील लसीचे क्लिनिकल ट्रायल सुरु आहे.
 

 "