Mon, Apr 06, 2020 09:25होमपेज › Mumbai-Thane-Raigad › फोन टॅपिंगची माहिती भाजपच्याच एका मंत्र्यानं दिली होती; राऊतांचा खळबळजनक खुलासा 

फोन टॅपिंगची माहिती भाजपच्याच एका मंत्र्यानं दिली होती; राऊतांचा खळबळजनक खुलासा 

Last Updated: Jan 24 2020 2:08PM

संजय राऊतमुंबई : पुढारी ऑनलाईन 

देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेनेचे खासदार आणि नेते संजय राऊत यांच्यासह दिग्गज नेत्यांचे फोन टॅपिंग केल्याचा आरोप झाला होता. यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोठा खुलासा केला आहे. तुमचे फोन टॅप होत आहेत अशी माहिती मला भाजपच्याच एका वरिष्ठ मंत्र्याने दिली होती, असा दावा राऊत यांनी केला आहे. याबाबत त्यांनी ट्विट केले आहे.

वाचा : देवेंद्र फडणवीस यांना 'सर्वोच्च' दिलासा! खुल्या कोर्टात सुनावणीची विनंती सुप्रीम कोर्टाकडून मान्य

''तुमचे फोन टॅप होत आहेत. अशी माहिती मला भाजपच्याच एका वरिष्ठ मंत्र्याने दिली होती. त्यावेळी मी म्हटले होते की, माझे म्हणणे कोणी ऐकून घेत असेल तर, स्वागत आहे...मी बाळासाहेब ठाकरे यांचा शिष्य आहे. मी कोणतेही काम अथवा वक्तव्य लपूनछपून करत नाही. माझे म्हणणे ऐकाच.'' असे राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यांच्या या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. 

वाचा : महाराष्ट्रात सत्ताबदल; शरद पवारांच्या दिल्लीतील सुरक्षाव्यवस्थेत कपात, राष्ट्रवादी आक्रमक

राज्यात सत्तास्थापनेचा प्रयत्न होत असताना काही राजकीय नेत्यांचे फोन टॅप, तर व्हॉट्सअ‍ॅप हॅक करण्यात आले होते. ते कोणी केले व त्यामध्ये कोणते अधिकारी राजकीय दबावाखाली होते, याची गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विचारणा केल्याचे समजते. कोरेगाव-भीमा प्रकरणात सरकार विरोधी विचारधारा ठेवणार्‍या समाजसेवक व कार्यकर्त्यांचे फोन ट्रॅपिंग केल्याच्या तक्रारी गृहमंत्र्यांकडे आल्या होत्या.