Wed, Dec 02, 2020 08:02होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ठाणे : नेवाळीत डॉक्टरला कोरोना, परिसर सील

ठाणे : नेवाळीत डॉक्टरला कोरोना, परिसर सील

Last Updated: May 23 2020 2:35PM
नेवाळी : पुढारी वृत्तसेवा

कोरोनाचा फैलाव वाढू लागल्याने ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण जनतेची चिंता वाढू लागली आहे. आता ग्रामीण भागातदेखील कोरोनाचा शिरकाव होऊ लागला आहे. ठाणे जिल्ह्यात गेल्या आठवडाभरात कोरोना बाधितांचा आकडा आजूबाजूच्या शहरात वाढला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. नेवाळीमधील मुंबईत एका रुग्णालयात काम करणाऱ्या डॉक्टरला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे आता नेवाळी परिसरातदेखील कोरोनाने प्रवेश केला आहे.

ठाणे जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव शहरासह ग्रामीण भागामध्येसुद्धा आता दिवसेंदिवस कोरोनाचा प्रसार वाढत चाललेला आहे. नेवाळीत राहणाऱ्या एका डॉक्टरला कोरोनाची लागण झाल्याने ग्रामपंचायतीने परिसरातील सर्व दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतला. नेवाळी परिसरात असलेल्या अत्यावश्यक सेवेतील दुकाने आणि खत, बियाणांची दुकाने सोडून सर्व दुकाने बंद करण्याचा निर्णय ग्रामपंचायत प्रशासनाने घेतला आहे. कोरोनाची लागण झालेल्या डॉक्टरने नेवाळी मधील आत्माराम नगर, नेवाळी गाव आणि द्वारलीमध्ये वास्तव्य केले आहे. त्यामुळे नेवाळी ग्रामपंचायत आणि पोलिस प्रशासनाने परिसरात जंतूनाशक फवारणी करून परिसर सील केला आहे.

कोरोनामुळे दुकाने बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दुकाने सुरू ठेवणाऱ्या मालकांवर कारवाई करण्यात येणार आहे.त्यामुळे अत्यावश्यक सेवा सोडून नेवाळी कडकडीत बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.