Mon, Nov 30, 2020 12:46होमपेज › Mumbai-Thane-Raigad › साधा संधी! 'महापारेषण' होणार महाभरती

साधा संधी! 'महापारेषण' होणार महाभरती

Last Updated: Oct 24 2020 10:19AM

संग्रहीत छायाचित्रमुंबई : पुढारी वृत्तसेवा 

ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी धम्मचक्र प्रवर्तनाच्या पावन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील तरुणांना नोकरीच्या संधीच्या रूपात एक आगळी भेट देण्याचा निर्णय घेतला आहे. ऊर्जा विभागाच्या 'महापारेषण' या वीज कंपनीत जवळपास ८५०० तांत्रिक श्रेणीतील रिक्त पदे भरण्याचे आदेश राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी आज दिले. त्यामुळे राज्यात मेगा-भरतीचा मार्ग आता मोकळा झाल्याने हजारों तरुणांच्या नोकरीचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

'तर भाजपकडून सांगितले जाईल लस टोचण्यासाठी आधी पक्षांतर करा, नाहीतर बसा बोंबलत!'

राज्यात वीज पारेषण कंपनीत तांत्रिक श्रेणीतील ८ हजार ५०० पदांची ही भरती प्रक्रिया आता लवकरच सुरू होणार आहे. तांत्रिक संवर्गातील ६७५० पदे व अभियंता संवर्गातील १७६२ पदांची मेगा भरती करण्यासाठी महापारेषण व्यवस्थापन तयारी करत आहे. यामुळे बेकारीचे संकट झेलणाऱ्या हजारो तरुणांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

डॉ. राऊत यांच्या सुचनेनुसार महापारेषणचे व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे यांनी हा पदभरती प्रस्ताव तयार करून सादर केला. आज मंत्रालयात या विषयावर झालेल्या बैठकीत डॉ. राऊत यांनी ही पद भरती लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश दिले. नव्याने होणाऱ्या या पदभरतीत आय.टी. आय. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. याशिवाय अभियांत्रिकी पदवीधारकांनाही नोकरीची संधी या भरतीत निर्माण होणार आहेत. यासोबतच बक्षी समितीच्या शिफारशींचा भरती प्रक्रियेत पदांच्या बाबतीत तुलनात्मक विचार करावा आणि भरती प्रक्रिया राबवावी असे डॉ. राऊत म्हणाले. तसेच नवा मंजूर पदाचा आकृतीबंध राज्य शासनास सादर करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

केकाटणाऱ्या रिपब्लिक टीव्हीसह अर्णव गोस्वामींना दणक्यावर दणके सुरुच!

पूर्वीच्या महाराष्ट्र राज्य वीज मंडळाचे सन २००५ साली महावितरण, महापारेषण,  महानिर्मिती व सूत्राधारी कंपन्यांमध्ये विभाजन झाल्यानंतर महापारेषण कंपनीत रिक्त पदांची संख्या वाढत गेल्यानंतरही अपेक्षित भरती करण्यात आलेली नाही. त्यामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा बोजा वाढल्याने ताण निर्माण झाला आहे. आता लवकरच पदभरती होत असल्याने कोरोना काळात राज्यात सरकारी नोकरीची संधी हजारो तरुणास उपलब्ध होणार आहे.

भाजपला सलग दुसऱ्या दिवशी भगदाड! सहयोगी आमदार आज शिवसेनेत प्रवेश करणार

यंत्रचालक, तंत्रज्ञ संवर्ग एकत्रीकरण

यंत्रचालक व तंत्रज्ञ संवर्गाचे एकत्रीकरण करण्याचा निर्णयही डॉ. राऊत यांनी घेतला. यामुळे कनिष्ठ स्तरावर काम करणाऱ्या तांत्रिक कर्मचाऱ्यांना पदोन्नतीचा मार्ग मोकळा होणार आहे. बदलत्या गरजेनुसार नवीन कौशल्य निर्माण करण्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. अनेक वर्षे पदे रिक्त असल्याने पदोन्नतीमध्ये निर्माण झालेली कुंठित अवस्था या मेगा भरतीमुळे संपुष्टात येणार असल्याने महापारेषण कंपनीत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.