Wed, Nov 20, 2019 02:54



होमपेज › Mumbai-Thane-Raigad › केबीसीमध्ये शिवरायांचा एकेरी उल्‍लेख; राष्ट्रवादीची निदर्शने

केबीसीमध्ये शिवरायांचा एकेरी उल्‍लेख; राष्ट्रवादीची निदर्शने

Last Updated: Nov 08 2019 3:31PM




मुंबई : प्रतिनिधी 

सोनीवरील कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा नामोल्लेख एकेरी केल्याच्या निषेधार्थ आज राष्ट्रवादी काँग्रेसने सोनी टीव्हीच्या कार्यालयासमोर निदर्शने केली. यानंतर सोनी टीव्हीच्यावतीने राष्ट्रवादीकडे लेखी माफीनामा देण्यात आला आहे. 

कौन बनेगा करोडपती कार्यक्रमात छत्रपती शिवरायांचा एकरी उल्‍लेख केल्‍याच्या निषेधार्थ राष्‍ट्रवादीने आंदोनलाचे हत्‍यार उपसले होते. आज दुपारी १२ वाजता मालाड येथील सोनी कार्यालयासमोर निदर्शने करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष आमदार नवाब मलिक यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो कार्यकर्ते व पदाधिकारी जमा झाले होते. यावेळी राष्‍ट्रवादीच्या आंदोलकांनी सोनी टिव्हीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यानंतर  सोनी टिव्हीच्या व्यवस्थापन विभागामार्फत आपला लेखी माफीनामा राष्ट्रवादीकडे देण्यात आला. 

यावेळी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने मुंबई अध्यक्ष आमदार नवाब मलिक यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष अॅड. अमोल मातेले, राष्ट्रवादी मुंबई युवक अध्यक्ष अॅड. निलेश भोसले, उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष अॅड. इंद्रपाल सिंग, उत्तर पश्चिम जिल्हाध्यक्ष अजित रावराणे, कार्याध्यक्षा फेमिदा खान, मुंबई पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.