Wed, Jan 20, 2021 10:09होमपेज › Mumbai-Thane-Raigad › 'पोलिस ठाण्याच्या चकरा मारतोय, आम्हाला बिहारला पाठवा'

'पोलिस ठाण्याच्या चकरा मारतोय, आम्हाला बिहारला पाठवा'

Last Updated: May 23 2020 11:01AM

मुंबईत अडकलेल्या मजुरांनी सोनू सूदकडे मागितली मदत (Photo-Twitter)मुंबई : पुढारी ऑनलाईन 

मुंबईहून प्रवाशांना त्यांच्या घरी पाठवण्यासाठी अभिनेता सोनू सूद पुढे सरसावला आहे. सोनू लोकांच्या संपर्कात असून त्यांना मदत करत आहे. ट्विटरवर त्याचे काम पाहून लोक त्याचे कौतुक करत आहेत. त्याचबरोबर, #SonuSood असे ट्रेंडिंगही ट्विटरवर सुरू आहे. मुंबईत अडकलेले लोक सोनू सूदकडे मदत मागत आहेत आणि सोनी सूद त्यांना आपापल्या घरी पाठवण्यासाठी प्रयत्न करत आहे.  

मुंबईमध्ये राहणाऱ्या एका प्रवाशाने सोनू सूदला टॅग करत लिहिलं की, आम्ही भाई लोक १६ दिवसांपासून पोलिस ठाण्याच्या चकरा मारतोय. परंतु, काम होत नाही. आम्ही धारावीमध्य राहतो आणि बिहारलाजायचं आहे.'  यावर सोनू सूदने उत्तर देताना लिहिलं की, 'भाई चकरा मारायच्या बंद करा आणि आराम करा. दोन दिवसात बिहारमध्ये आपल्या घराचे पाणी प्याल. माहिती पाठवा.'

आणखी एका व्यक्तीने सोनूकडे मदत मागितली आहे. त्याने लिहिले आहे- 'सर आम्ही लोक मुंबईत अडकलो आहोत. बिहारला जायचं  आहे. पोलिस ठाण्यात अर्ज भरला आहे. अद्याप फोन आलेला नाही.' यावर सोनू सूदने उत्तर दिलं, 'तुमची माहिती पाठवा, आई-वडिलांना भेटण्याची वेळ आली आहे, माझ्या मित्रा.'

इतकेच नाही तर सोनू सूदचे हे काम पाहून एक सोशल मीडिया युजर मदतीसाठी पुढे आला. त्या युजरने लिहिलं, 'इतक्या पवित्र कामासाठी धन्यवाद सोनूजी. जर कोणत्याही प्रकारच्या मदतीसाठी फंड्सची गरज असेल तर कृपया एक ट्विट करा.' यावर सोनू सूद यांनी उत्तर देताना लिहिलं की, 'भावा, केवळ शुभेच्छा हव्या आहेत.' 

सोशल मीडियावर सोनू सूदला आता लोक 'सुपरहिरो' म्हणत आहेत. एका युजरने लिहिलं आहे, सलमान खानला भेटण्याची माझी इच्छा होती. परंतु, आता तुला भेटायची इच्छा आहे सोनू भाई. आवश्य भेटू.' यावर सोनू म्हणाला, 'ईश्वर आपणास दीर्घायुष्य देवो. लवकरच भेट होईल.'