आशालता वाबगावकर : गायिका ते अभिनेत्री...!

Last Updated: Sep 22 2020 9:25AM
Responsive image
आशालता वाबगावकर


पुढारी ऑनलाईन डेस्क

ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे कोरोनाने निधन झाले. सातारा येथे 'आई माझी काळुबाई' या मालिकेच्या शुटिंगदरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाली होती. सातारा येथील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे वय ७९ होते. त्यांच्या जाण्याने सिनेसृष्टीचे मोठं नुकसान झाल्याच्या भावना अनेक कलाकारांनी व्यक्त केल्या आहेत.

आशालता वाबगावकर ह्या मराठी गायिका, नाट्यअभिनेत्री व चित्रपट अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी १०० हून अधिक मराठी, हिंदी चित्रपटांत काम केले आहे. त्यांचा जन्म मुंबईत ३१ मे १९४१ रोजी झाला. त्यांचे शिक्षण मुंबईत झाले. 'अपने पराये' (हिंदी) हा त्यांनी काम केलेला पहिला चित्रपट. या चित्रपटातील भूमिकेबद्दल आशालतांना बेंगाल क्रिटिक्सचे पारितोषिक मिळाले. रायगडाला जेव्हा जाग येते हे त्यांचे पहिले नाटक होते.  

आत्मविश्वास, तिन्ही सांज,  पकडापकडी, मणी मंगळसूत्र, लेक लाडकी, वन रुम किचन या चित्रपटात त्यांनी काम केले आहे. त्यांनी अनेक नाट्यगीते गायिली आहेत.

आशालता यांच्या भूमिका असलेली नाटके

आश्चर्य नंबर १० (१९७१)
गरुड झेप (१९७३)
गुड बाय डॉक्टर (१९७६)
गुंतता हृदय हे (१९७४)
गोष्ट जन्मांतरीची (१९७८)
छिन्न (१९७९)
देखणी बायको दुसऱ्याची (१९९२)
मत्स्यगंधा (१९६४)
रायगडाला जेव्हा जाग येते (१९६२)
विदूषक (१९७३)

चित्रपट

आत्मविश्वास (१९८९)
तिन्ही सांजा(२००९)
पकडापकडी (२०११)
मणी मंगळसूत्र (२०१०)
लेक लाडकी (२०१०)
वन रूम किचन (२०११)
उंबरठा (१९८२)
माहेरची साडी (१९९१)
नवरी मिळे नवऱ्याला (१९८४)

आशालता यांनी गायलेली नाट्यगीते 

अर्थशून्य भासे मज हा कलह प्रीतीचा (मत्स्यगंधा)
गर्द सभोतीं रानपाखरे, तू तर चाफेकळी (मत्स्यगंधा)
जन्म दिला मज त्यांनी (मत्स्यगंधा)
तव भास अंतरा झाला (मत्स्यगंधा)
स्वप्ननगरच्या सुंदर माझ्या (विदूषक)

खडसेंसोबत गेले भाजपचे कार्यालय!; मुक्ताईनगरात भाजपला कार्यकर्त्यांसह कार्यालयही शोधावे लागणार 


पंकजा मुंडेंनी शरद पवारांना 'या' कारणासाठी केली विनंती, म्हणाल्या...


ठाणे : १०१ तृतीयपंथियांच्या ओट्या भरून दसरा साजरा


करवीरनिवासिनी श्री अंबाबाईची महिषासूरमर्दिनी रूपात पूजा 


मिर्झापूर- 2 वेबसीरिजवर मिर्झापूरच्या खासदारांनी केला आरोप, म्हणाले....


साताऱ्यात पोलिसांचे 'मॉक ड्रिल' 


शिवसेनेत जाणार असल्याच्या अफवांवर पंकजा मुंडेंचा खुलासा, म्हणाल्या...


KXIPvsSRH : रोमहर्षक सामन्यात पंजाबची सरशी


मराठा समाज्यावतीने 'काळी दिवाळी' साजरी करण्याचा इशारा


नाशिक : वन विभागाने चार बिबट्यांना केले जेरबंद