Thu, Sep 24, 2020 10:57होमपेज › Mumbai-Thane-Raigad › छत्रपती शिवरायांचा राजकारणासाठी वापर चुकीचा : संजय राऊत

'छत्रपती शिवरायांचा राजकारणासाठी वापर चुकीचा'

Last Updated: Jan 21 2020 10:57AM
मुंबई : पुढारी ऑनलाईन

आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराची जोरदार तयारी सुरु केली आहे. मात्र, दिल्लीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिटिकल कीडा या ट्विटर हँडलवरुन तानाजी चित्रपटातील दृष्यांना मॉर्फिंग करुन छत्रपती शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा लावण्यात आला आहे. तसेच तानाजी मालुसरे यांच्या चेहऱ्यांवर गृहमंत्री अमित शहा यांचा चेहरा लावण्यात आल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषेद घेऊन नाराजी व्यक्त केली आहे. 

संजय राऊत म्हणाले, छत्रपती शिवराय हे युगपुरूष आहेत. त्यांचा असा अपमान आम्ही सहन करणार नाही. असा इशारा देत छत्रपती शिवरायांचा राजकारणासाठी वापर चुकीचा आहे, अशी प्रतिक्रीया राऊतांनी यावेळी दिली. 

तसेच, हा व्हिडिओ  मी संभाजी भिडेंपासून भाजपच्या सगळ्या नेत्यांना पाठवला आहे व त्यांच्या प्रतिक्रियेची वाट पाहतो आहे. शिवसेनेच्या विरोधात सातारा, सांगली येथे बंद पुकारणारे या व्हिडिओवर काय प्रतिक्रिया देतात हे मला पाहायचे असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. तसेच शिवसेनेच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या सर्व संघटना आता कुठे गेल्या? असा सवाल देखील संजय राऊत यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

नेमके काय प्रकरण? 

पोलिटिकल कीडा या ट्विटर हँडलवरुन दिल्ली निवडणूक 2020 असे नाव देऊन एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये तानाजी चित्रपटात तानाजी मालुसरे यांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता अजय देवगणच्या चेहऱ्याच्या जागी अमित शहा यांचा चेहरा लावण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकरणाऱ्या शरद केळकरच्या चेहऱ्यांच्या जागी नरेंद्र मोदी यांचा चेहरा दाखवण्यात आला आहे. तसेच उदयभान राठोडची भूमिका साकारणाऱ्या सैफ अली खानच्या जागी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा चेहरा लावण्यात आला आहे. त्यामुळे या व्हिडिओवरुन महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

Delhi Election 2020 ft. Shah-ji pic.twitter.com/I1WFf3lYnL

— Political Kida (@PoliticalKida) January 19, 2020
 "