Sat, Jan 23, 2021 06:06होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राऊत म्‍हणतात, हवा को गुमान था, अपनी आजादी पर...

राऊत म्‍हणतात, हवा को गुमान था, अपनी आजादी पर...

Last Updated: Dec 03 2019 9:58AM

संजय राऊतमुंबई : पुढारी ऑनलाईन

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी ट्विटरच्‍या माध्‍यमातून भाजपला झोडपण्‍याचे काम सुरु ठेवेले आहे. नेहमी प्रमाणे संजय राऊत यांनी शेर ट्विट करत राज्‍यातील भाजपच्‍या सद्‍यस्‍थितीची जाणीव करुन दिली आहे.

संजय राऊत यांनी ट्विटमध्‍ये म्‍हटले आहे की, ''हवा को गुमान था, अपनी आज़ादी पर..किसी ने उसे भी गुब्बारे में भर के बेच दिया !.....जय महाराष्ट्र.'' म्‍हणजेच हवेला आपल्‍या स्‍वातंत्र्यावर गर्व होता. मात्र याच हवेला कुणीतरी फुग्‍यात भरुन विकले आणि तिचे अस्‍तित्‍वच नष्ट झाले. पहिल्या २० मिनिटांतच त्यांचे हे ट्विट दीड हजारहून अधिक जणांनी लाईक केले आहे. तर जवळपास ३०० जणांनी ही शायरी रिट्विट केली आहे. काल राऊत यांनी वक्त चित्रपटातील राजकुमार यांचा डायलॉग वापरुन भाजपावर अप्रत्यक्षपणे टीका केली होती. जिनके घर शीशे के होते हैं, वह दुसरों के घर पत्थर नहीं फेका करते, असे ट्विट राऊत यांनी केले होते. 

मोठे नेते शिवशेनेच्‍या वाट्‍यावर असल्‍याचा खुलासा काल संजय राऊत यांनी  केला होता. तसेच पंकजा मुंडे यांच्‍याविषयी देखील १२ डिसेंबरला कळेल, असा खुलासा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला होता. यावर भाजपकडून लगेच पत्रकार परिषद घेत त्‍या शिवसेनेत प्रवेश करणार नसल्‍याचे सांगण्‍यात आले होते. 

याच परस्‍थितीला अनुसरुन संजय राऊत यांनी सोशल मीडियाच्‍या माध्‍यमातून आपली भूमिका मांडली आहे. कारण एक काळ असा होता देशासह राज्‍यात देखील भाजपचे सरकार होते. अनेक मोठ्‍या नेते भाजपमध्ये प्रवेश करण्‍यास उत्‍सुक होते. आता मात्र परस्‍थिती उलटी आहे. संजय राऊतांच्‍या कालच्‍या खुलास्‍यावरुन भाजपला गळती लागण्‍याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. 

महाराष्ट्रात शिवसेनेच्या नेतृत्वाखाली काँग्रेस आणि राष्ट्रवादीने सरकार स्थापन केले आहे. सत्ता स्थापनेपूर्वी व सत्ता स्‍थापनेनंतरही महाविकास आघाडीच्या नेत्यांची सोशल मीडियावर भाजप विरोधात फटकेबाजी सुरुच आहे.