Fri, Dec 04, 2020 04:54होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पोलिसांची भीती कमी झाली तर गुंडाराज येईल - संजय राऊत

पोलिसांची भीती कमी झाली तर गुंडाराज येईल - संजय राऊत

Last Updated: Jul 10 2020 12:42PM

शिवसेना खासदार संजय राऊतमुंबई : पुढारी ऑनलाईन

उत्तर प्रदेशातील आठ पोलिसांच्या हत्या करणाऱ्या गँगस्टर विकास दुबे आज पोलिसांच्याबरोबर झालेल्या चकमकीत ठार झाला. या चकमकीवरुन काँग्रेसनेत्या प्रियांका गांधी, समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. तर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी, पोलिसांची भीती कमी झाली तर गुंडाराज येईल. कानपूर एन्काऊंटरवर कुणीही राजकारण करु नये, अशी प्रतिक्रिया दिली आहे.   

चकमकीवर शंका उपस्थित करणं म्हणजे पोलिसाचं खच्चीकरण करण्यासारखं आहे. विकास दुबे एका दिवसात मोठा झालेला नाही. यासाठी कोणत्या एका सरकारला जबाबदार धरु नये. विकास दुबेला अनेक वर्षे राजकीय पाठबळ राहिले आहे, असे राऊत यांनी म्हटले आहे.

निवडणूक जिंकण्यासाठी, खंडणी गोळा करण्यासाठी काही राज्यात अशा लोकांना पोसलं जातंय. मात्र, कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये म्हणून खाकी वर्दीची भीती राहिली पाहिजे. आजचा एन्काऊंटर हा पोलिसांनी उगवलेला सूड आहे, असे राऊत यांनी नमूद केले आहे.

गँगस्टर विकास दुबे एन्काऊंटरमध्ये ठार झाल्याने उत्तर प्रदेशातील गेली ३० वर्षांची दुबेची दहशत संपली आहे.