Thu, Sep 24, 2020 15:59होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अजित पवार नाराज हे मला कसं कळणार; संजय राऊतांचा सवाल

अजित पवार नाराज हे मला कसं कळणार; संजय राऊतांचा सवाल

Last Updated: Aug 14 2020 1:11AM

अजित पवार, शरद पवार आणि संजय राऊतमुंबई : पुढारी ऑनलाईन

सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणी अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. यावर त्यांचे आजोबा आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया देत नातवाच्या या मागणीला कवडीची किंमत देत नाही, असे वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान, शरद पवार यांच्या या वक्तव्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार नाराज असल्याची चर्चा रंगली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांना सवाल केला असता अजित पवार नाराज आहेत हे मला कस कळणार, असा उलट सवाल केला आहे. 

पार्थ पवार हे अपरिपक्व आहेत. त्यांच्या मागणीला मी कवडीची किंमत देत नाही असे वक्तव्य काल शरद पवार यांनी केले होते. त्याच्या या वक्तव्यानंतर अजित पवार यांनी थेट सिल्व्हर ओक गाठत पवार यांची भेट घेतली. तसेस त्यांच्या वक्तव्यावर माध्यमांशी बोलणे टाळले. अजित पवार यांच्या या भूमिकेमुळे ते नाराज असल्याची चर्चा रंगली. 

या सर्व पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. ''पार्थ यांच्या भूमिकेवर पवार बोलले आहेत मी काय बोलणार असा सवाल करत पवारांच्या वक्तव्यावर फार चिंता करण्याचे कारण नाही. पवारांची कोणतीही वक्तव्य निरर्थक नसतात, अशी प्रतिक्रिया राऊत यांनी दिली आहे. 

तसेच अजित पवार नाराज आहेत असे विचारले असता राऊत यांनी अजित पवार नाराज हे मला कसं कळणार असा उलट सवाल करत अजित पवार नाराज असल्याची माहिती चुकीची असल्याचे स्पष्ट केले. 

काही दिवसांपूर्वी अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेत अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाची चौकशीची जबाबदारी सीबीआयकडे सोपवावी अशी मागणी केली. त्यांची ही मागणी शरद पवार यांनी धुडकावून लावली आहे.

 "