Wed, Dec 02, 2020 08:57होमपेज › Mumbai-Thane-Raigad › देश कोरोना संकटाशी झुंजत असताना सरकार पाडण्याचे भाजपकडून उपद्व्याप- शिवसेना

देश कोरोना संकटाशी झुंजत असताना सरकार पाडण्याचे भाजपकडून उपद्व्याप- शिवसेना

Last Updated: Jul 14 2020 9:09AM

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट. 

 

मुंबई : पुढारी ऑनलाईन

राजस्थानातील राजकीय घडामोडीवरुन शिवसेनेने भाजपवर जोरदार टिका केली आहे. देश कोरोना संकटाशी झुंजत असताना भारतीय जनता पक्षाने काही वेगळेच उपद्व्याप सुरु केले आहेत. या काळात भाजपने मध्य प्रदेशातील काँग्रेसचे सरकार पाडले. आता गेहलोत सरकार पाडून ढेकर देण्याच्या स्थितीत भाजप दिसत आहे, पण ते शक्य होईल असे दिसत नाही, अशा शब्दांत शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधला आहे.

वाचा : 'मुख्यमंत्र्यांची बाग बहुमत सिद्ध करण्याची जागा नव्हे'

जोपर्यंत आमदारांची डोकी नीट मोजली जात नाहीत. तोपर्यंत भारतीय जनता पक्ष उघडपणे पुढे येऊन काही करणार नाही. यासाठी भाजप उघडपणे काहीच करत नसून त्यांचे सरकार अस्थिर करण्याचे राष्ट्रीय कार्य पडद्यामागून चालले आहे. याक्षणी तरी भाजपच्या दृष्टीने पायलट यांचा पोरखेळ हा काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे व त्याच्याशी त्यांचा संबंध नाही. ज्योतिरादित्य शिंदे यांना फूस लावून फोडले तेव्हाही भाजपच्या दृष्टीने हा काँग्रेस अंतर्गत प्रश्न होता व आता पायलट यांची खेळी हा देखील अंतर्गत प्रश्नच आहे. महाराष्ट्रात अजित पवारांना घेऊन भाजपने सकाळीच शपथविधी उरकला. तेव्हाही तो राष्ट्रवादीचा अंतर्गत विषय होता, असे शिवसेनेने म्हटले आहे.

वाचा : पायलटांचे विमान उड्डाण करण्यापूर्वीच 'या' पंचकामुळे जमिनीवर!

लडाख सीमेवरील आपल्या २० सैनिकांचे सांडलेले रक्त अजून ताजे आहे. हे सर्व प्रश्न सोडवायचे राहिले बाजूला, काँग्रेसच्या अंतर्गत भांडणात टांग टाकून घोडेबाजारास उत्तेजन देण्याचे काम राजस्थानात सुरु आहे. वाळंवटात राजकीय उपद्व्याप करुन वादळ निर्माण करुन भाजप काय साध्य करणार आहे?, असा सवाल शिवसेनेने केला आहे.