Wed, Jan 20, 2021 08:31होमपेज › Mumbai-Thane-Raigad › 'राज ठाकरे आजही मित्र आहेत काय घाबरतो का'?

'राज ठाकरे आजही मित्र आहेत काय घाबरतो का'?

Last Updated: Jan 15 2020 2:34PM

संग्रहित छायाचित्रमुंबई : पुढारी ऑनलाईन 

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना चांगलीच फटकेबाजी केली. पत्रकारिता, अंडरवर्ल्ड, बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे अशा विविध विषयांवर त्यांनी परखड मत व्यक्त केले. राज ठाकरे त्यावेळी सुद्धा माझे मित्र होते आजही माझे मित्र आहेत, काय घाबरतो का ? अशी प्रतिक्रिया राऊत यांनी दिली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार स्तुतीसुमने उधळली. 

अधिक वाचा : कुठे शिवाजी राजे व कुठे 'हे' सर्व हवशे नवशे गवशे : शिवसेना

मी राज यांची समजूत काढायला गेलो तेव्हा माझी गाडीही फोडली होती. जे झाले ते झाले. त्यावेळीही राज हे माझे मित्र होते. आज आहेत का ? असे विचारण्यात आले असता काय घाबरतो का ? राज आजही मित्र आहेत असे राऊत यांनी स्पष्ट केले. 

अधिक वाचा : जाणता राजा फक्त छत्रपती शिवाजी महाराजच; उदयनराजेंचा टोला

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे माझे आदर्श आणि नेते होते. उद्धव आणि राज हे दोघेही शिवसेनेत होते. पुढे राज यांनी मनसेची स्थापना केली पण मी शिवसेनेबरोबरच राहिलो. बाळासाहेबांच्या शिवसेनेत उद्धव आणि राज होते. पुढे काही कारणास्तव राज पक्षातून बाहेर पडले आणि त्यांनी मनसेची स्थापना केल्याचे राऊत यांनी सांगितले. 

अधिक वाचा : काही क्रिकेटपटूंवर हनीट्रॅपचा प्रयत्न? 

बाळासाहेब आणि शरद पवार हे जनसामान्यांवर पगडा असलेले नेते आहेत. ते विजय खेचून आणू शकतात. परिवर्तन घडवू शकतात यावर माझा पहिल्यापासून विश्वास असल्याचे ते म्हणाले.