Sun, Oct 25, 2020 08:12होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘शरद पवारांना केंद्रातील सत्तेत वाटा मिळेल’

‘शरद पवारांना केंद्रातील सत्तेत वाटा मिळेल’

Last Updated: Sep 28 2020 5:50PM

रामदास आठवले आणि शरद पवारमुंबई : पुढारी ऑनलाईन

शिवसेनेपाठोपाठ अकाली दल पक्ष एनडीएतून बाहेर पडला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले मोठे वक्तव्य केले आहे. शेतकऱ्यांच्या भल्यासाठी शरद पवार यांनी एनडीएत यावं. शरद पवार आले तर केंद्रातील सत्तेत वाटा मिळेल, असे आठवले यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटले आहे. 

वाचा : 'शिवसेनेनं भाजपसोबत सरकार बनवावं; ५०-५० चा फॉर्म्युला शक्य'

नुकतीच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीचा संदर्भ देत आठवले यांनी, भाजपशी युती झाल्यास शिवसेनेला फायदा होईल, असा दावा केला आहे. ५०-५० फॉर्म्युल्यानुसार शिवसेनेने भाजपसोबत सरकार बनवावं. शिवसेनेने भाजपसोबत रिपाईंला देखील सोबत घ्यावं, असे आठवले यांनी म्हटले आहे.

वाचा : UPSC परीक्षा पुढे ढकलणे अशक्य; सुप्रीम कोर्टात माहिती

देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांची शनिवारी एका पंचतारांकित हॉटेलात बैठक झाली. सुमारे दोन तास चाललेल्या या बैठकीत राजकीय परिस्थितीवर चर्चा झाल्याचे समजते. या पार्श्वभूमीवर आठवले यांनी शिवसेनेने भाजपसोबत येण्याचे आवाहन केले आहे.  

 "