Sun, Feb 28, 2021 06:28
श्रद्धा कपूर लग्नाच्या बेडीत अडकणार? शक्ती कपुरांनी दिली महत्त्वाची माहिती!

Last Updated: Jan 28 2021 8:47PM
पुढारी ऑनलाईन डेस्क

बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटीज विवाह बंधनात अडकत आहेत. परंतु सर्वात जास्त चर्चा आहे श्रद्धा कपूर आणि तिचा प्रियकर रोहन श्रेष्ठ यांच्या लग्नाची. तसेही श्रद्धाने रोहनबरोबरच्या तिच्या नात्याचा जाहीरपणे खुलासा केलेला नाही. रोहनबरोबर श्रद्धाचे बॉन्डिंग आणि चांगला वेळ घालवण्यावरून हे सिद्ध होते की ती लवकरच चाहत्यांना मोठी बातमी देऊ शकेल. (shraddha kapoor and rohan shrestha wedding rummer) 

Shraddha Kapoor's father Shakti Kapoor reacts to actress' wedding rumours  with beau Rohan Shrestha | Celebrities News – India TV

या चर्चेला वेग आला जेव्हा श्रद्धाचा प्रियकर रोहन श्रेष्ठने वरुणच्या लग्नाबद्दल सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या. मग वरुणने रोहनच्या लग्नाच्या तयारीविषयीही सांगितले. या संभाषणातून अभिनेत्रीच्या चाहत्यांना कल्पना आली की वरुण हे सांगत असताना श्रद्धा आणि रोहनच्या लग्नासाठी योजना चालू आहे.

Shakti Kapoor on Shraddha Kapoor's Marriage Rumours: Rohan Shrestha is Very  Nice Boy

श्रद्धाच्या लग्नाच्या चर्चेमुळे पिता शक्ति कपूर यांना धक्का बसला. मुलीच्या लग्नाच्या चर्चेवर त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली असून यातून असे दिसून आले आहे की शक्ती कपूर यांनी मुलीच्या लग्नाच्या निर्णयावर कोणतीही अडचण नाही आणि ती तिच्या आवडीनुसार लग्न करू शकते.

Shraddha Kapoor planning to marry boyfriend Rohan Shrestha soon? Actress  opens up | Celebrities News – India TV

चाहत्यांना बसला धक्का 

रोहनच्या श्रद्धाबरोबरच्या नात्याबद्दल शक्ती कपूरना माहित नसल्यामुळे फॅन्स आश्चर्यचकित झाले. शक्ती कपूरना वाटत होते, की ते फक्त चांगले दोस्त आहेत. मात्र, मुलीच्या निर्णयाला पाठिंबा देणार त्यांनी निश्चित केले आहे.