Tue, Sep 22, 2020 06:46होमपेज › Mumbai-Thane-Raigad › व्हॉट्सॲपचे 'हे' जबरदस्त फिचर आता फेसबुक मेसेंजरमध्येही येणार!

व्हॉट्सॲपचे 'हे' जबरदस्त फिचर आता फेसबुक मेसेंजरमध्येही येणार!

Last Updated: Jun 15 2020 7:21PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

सोशल नेटवर्किंग साईट असलेली फेसबुक आपल्या मेसेंजर अॅपसाठी नवीन फिचरची टेस्टिंग घेत आहे. यामुळे मेसेंजर अ‍ॅपला अतिरिक्त सुरक्षा मिळणार आहे. Engadget  ने दिलेल्या अहवालानुसार हे फिचर मेसेंजर अॅपला बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन टूल देईल जे यूझर्स फेस आयडी किंवा फिंगरप्रिंटद्वारे वापरण्यास सक्षम असतील. हे फिचर व्हॉट्सअ‍ॅपवर आधीपासून अस्तित्त्वात आहे. या फीचरच्या माध्यमातून वापरकर्ते व्हॉट्सअ‍ॅप प्रमाणेच अ‍ॅपमध्ये लॉक टाइम सेट करू शकतील.

अधिक वाचा : करण जोहर आणि आलियावर नेटकरी का भडकले?

युझर्सना ४ टायमिंग ऑप्शन्स मिळतील

या फिचरच्या मदतीने, युझर्सना ॲप लॉक करण्यासाठी ४ पर्याय मिळणार आहेत. यामध्ये  मी मेसेंजर ॲपमधून बाहेर पडल्यानंतर असा असेल. म्हणजेच, आपण बाहेर पडताच अॅप लॉक होईल. या व्यतिरिक्त, आपण १ मिनिट, १५ मिनिटे आणि १ तासाचा पर्याय निवडता येईल. 

अधिक वाचा : सुशांत सिंह राजपूतची बातमी ऐकताच अंकिता लोखंडे एकाच शब्दात म्हणाली..

मेसेंजरवरील हे फिचर व्हॉट्सअ‍ॅपप्रमाणेच काम करेल. व्हॉट्सअ‍ॅपवर युजर्सना अ‍ॅप लॉक करण्यासाठी ३ ऑप्शन्स मिळतात, परंतु मेसेंजरमध्ये तुम्हाला यासाठी चार ऑप्शन्स मिळणार आहेत. यूझर्सना स्कॅमपासून वाचवण्यासाठी फेसबुकने अलीकडेच 'सेफ्टी नोटीस' फीचरसुद्धा आणले आहे. या फिचरच्या मदतीने, युझर्सना शंकास्पद ॲक्टिव्हिटीचा अलर्ट मिळणार आहे. 

अधिक वाचा : सुशांत सिंह राजपूत शेवटच्या पोस्टमध्ये आईला आठवताना म्हणतो..

 "