Tue, Jun 15, 2021 11:17
ATM जास्त वापरण आता पडणार महागात  

Last Updated: Jun 11 2021 9:03PM

file photo
पुढारी ऑनलाईन डेस्क : तुमचे जर बँकेत खाते असेल तर तुम्ही एटीएम कार्ड देखील वापरत असाल. मग ही बातमी तुमच्या उपयोगाची आहे. आता जर तुम्ही बँकेच्या एटीएममधून निश्चित मर्यादेपेक्षा जास्त पैसे काढले किंवा बॅलेन्स तपासण्यासारखे कोणतेही काम केले तर त्यासाठी बँक अधिक फी आकारणार आहे. खाते एका बँकेत आणि दुसऱ्या बँकेचे एटीएम वापरल्यास आता काळजी घ्यावी लागणार आहे. कारण आता त्याचे नियम बदलले आहेत.

वाचा : 'त्या' रणरागिणीच्या दोन्ही मुलींना मोफत शिक्षण

नियमात काय बदल झाले आहेत? 

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) बँकांना एटीएम वापरण्यासाठी ग्राहकांकडून जास्त शुल्क घेण्यास परवानगी दिली आहे. ही वाढ १ जानेवारी २०२२ पासून लागू होईल. याअंतर्गत डेबिट कार्ड विहित मर्यादेपेक्षा अधिक वापरण्यासाठी तुम्हाला २० रुपयांऐवजी २१ रुपये प्रती व्यवहार द्यावे लागतील. आरबीआयने एक परिपत्रक जारी केले असून असे म्हटले आहे की, या बदलामुळे बँका इंटरचेंज फी आणि किंमतीतील वाढीची भरपाई करू शकतील.

कार्डधारकांसाठी एटीएम व्यवहाराच्या महिन्याच्या मर्यादेत कोणताही बदल झालेला नाही. जर आपण आपल्या बँकेचे डेबिट कार्ड त्याच बँकेच्या एटीएममध्ये वापरत असाल आणि ते एका महिन्यात ५ वेळा वापरत असाल तर कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. आपण इतर कोणत्याही बँकेच्या एटीएमचा वापर केल्यास महिन्याची ही मर्यादा ३ वेळा असेल. मेट्रो शहरांमध्ये आणि इतर शहरांमध्येही ही मर्यादा वेगळी आहे. मेट्रो शहरांमध्ये केवळ ३ व्यवहार विनामूल्य आहेत. इतर शहरांमध्ये एटीएम व्यवहार ५ वेळा विनामूल्य करता येतात. हे व्यवहार एटीएममधून सर्व प्रकारच्या वापरासाठी मोजले जातील. आपण पैसे काढून घेतले नाहीत, फक्त बॅलन्स तपासला. किंवा काहीतरी वेगळं केले. अशी सर्व कामे एका व्यवहारामध्ये मोजली जाणार आहेत.

वाचा : दिलीप कुमार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज

आरबीआयने बँकांच्या इंटरचेंज फी मध्येही वाढ केली आहे. १ ऑगस्ट २०२१ पासून ही अंमलात येईल. इंटरचेंज फी असे शुल्क आहे जेव्हा आपण दुसर्‍या बँकेच्या एटीएमवर आपले कार्ड वापरता तेव्हा आपल्या बँकेकडून शुल्क आकारले जाते. एटीएममधून पैसे काढण्याच्या बाबतीत ही इंटरचेंज फी सध्या १५ रुपये आहे, जी ऑगस्टपासून १७ रुपये असणार आहे. जर तुम्ही बॅलन्स चेक किंवा मिनी स्टेटमेन्ट सारखे कोणतेही काम केले तर ते ५ रुपयांवरून ६ रुपयांपर्यंत वाढले आहे.

शुल्क वाढविण्याचे कारण

शुल्क वाढीमागील एटीएम बसविण्याच्या किंमतीत लक्षणीय वाढ झाली असल्याचे आरबीआयने म्हटले आहे. त्याची देखभाल खर्चही वाढला आहे. एटीएमशी संबंधित शुल्कचा आढावा घेण्यासाठी आरबीआयने जून २०१९ मध्ये एक समिती स्थापन केली होती. भारतीय बँक असोसिएशनचे मुख्य कार्यकारी अध्यक्ष. त्या समितीच्या सूचनांच्या तपासणीनंतर नवीन आदेश देण्यात आले आहेत.
आरबीआयने निवेदनात म्हटले आहे की, एटीएम व्यवहारांवरील बँकांचे इंटरचेंज फी ऑगस्ट २०१२ मध्ये अखेर बदलण्यात आले होते. तर ग्राहकांकडून घेतलेल्या शुल्काच्या अखेरचे ऑगस्ट २०१४ मध्ये सुधारणा करण्यात आली  होती. दोन्हीमध्ये फी वाढवून बराच वेळ निघून गेला आहे.

भारतात ९० कोटीहून अधिक डेबिट कार्ड

डेबिट किंवा एटीएम कार्ड आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा घटक बनला आहे. देशातील विविध बँकांची ९० कोटीहून अधिक डेबिट कार्ड आहेत. मार्च २०२१ पर्यंतचा हा डेटा आहे. भारतात ऑनसाईट एटीएमची एकूण संख्या १,१५,६०५ आहे. म्हणजे बँकेच्या शाखेत स्थापित केलेले एटीएम. याशिवाय बँक शाखेच्या बाहेर असलेल्या साइटवर असलेल्या एटीएमची संख्या ९७,९७० आहे.

भारतातील पहिले एटीएम १९८७ मध्ये सुरु झाले होते. एचएसबीसी बँकेने ते मुंबईत सुरु केल होत. पुढच्या १२ वर्षांत म्हणजेच १९९७ पर्यंत भारतात सुमारे १५०० एटीएम बसविण्यात आले. १९९७ मध्ये भारतीय बँक असोसिएशनने (आयबीए) स्वधन ची स्थापना केली. एटीएमचे हे पहिले नेटवर्क होते. त्याअंतर्गत वेगवेगळ्या बँकांच्या एटीएममधून व्यवहार करण्यास परवानगी देण्यात आली.

वाचा : येत्या पाच दिवसात 'या' जिल्ह्यात पडणार मुसळधार पाऊस 

वाचा : चेल्लम सरांनी दिली मुंबई पोलिसांना टीप