Mon, Mar 08, 2021 18:39
'रात्रीस खेळ चाले-३' मध्ये अण्णा नाईकांच्या नव्या भूमिकेचा खुलासा 

Last Updated: Feb 23 2021 1:21PM

पुढारी ऑनलाईन डेस्क 

रात्रीस खेळ चाले या लोकप्रिय मालिकेच्या तिसऱ्या भागाची चर्चा रंगली असताना अण्णा नाईकांचीही जोरदार चर्चा सुरू आहे. या मालिकेत अण्णा नाईक, शेवंता, चोंट्या अशा व्यक्तीरेखा होत्या. आता नव्या भागात हे कलाकार असणार का याचीदेखील चर्चा सुरू आहे. या मालिकेत अण्णा नाईक एका वेगळ्या भूमिकेत दिसणार असून याबद्दलचा खुलासा त्यांनी एका मुलाखतीत केला. 

वाचा - शशांक केतकरच्या घरी ज्युनिअर 'श्री'ची एन्ट्री 

अण्णा नाईकांचा दरारा आता पुन्हा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 'रात्रीस खेळ चाले भाग - २' मध्ये अण्णा नाईकांचा मृत्यू दाखवला होता. त्यामुळे आता तिसऱ्या भागात अण्णा नाईक कोणत्या रुपात दिसणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. आता प्रेक्षकांची प्रतीक्षा संपली असून अण्णा नाईक रात्रीस खेळ चाले ३ मध्ये एका भूताच्या रुपात दिसणार आहेत. हा खुलासा स्वत: अण्णा नाईक अर्थातचं माधव अभ्यंकर यांनी केला. एका मुलाखतीत त्यांच्या नव्या भूमिकेबद्दल विचारले असताना त्यांनी हा खुलासा केला आहे. त्यामुळे या मालिकेत काय होणार, शेवंता पुन्हा दिसणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

वाचा - 'मैंने प्यार किया' फेम सांगलीची भाग्यश्री आजही फिट

नाईकांच्या वाढ्यात आणखी कोणत्या कोणत्या रहस्यमयी गोष्टी घडणार आहेत. दत्ता, सुष्मा, वच्छी, पांडू, अभिराम, छाया, अण्णा नाईक, माई, शेवंता यांची गूढ कथा पुन्हा समोर येणार का, आता हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.