Sun, Feb 28, 2021 06:02होमपेज › Mumbai-Thane-Raigad › चुकीच्या टॅक्सीत बसणे  महिलेला पडले महागात

चुकीच्या टॅक्सीत बसणे  महिलेला पडले महागात

Published On: Dec 25 2017 1:42AM | Last Updated: Dec 25 2017 11:18AM

बुकमार्क करा

ठाणे : प्रतिनिधी

आपण कोणत्या टॅक्सीत बसतोय याची खात्री न करणे ठाण्यातील महिलेला रविवारी भयंकर महागात पडले. काशिमीरा येथून ठाण्याकडे येण्यास निघालेली ही महिला ओला समजून भलत्याच टॅक्सीत बसली आणि टॅक्सीचालकासह त्याच्या साथीदाराने या महिलेवर वज्रेश्‍वरीत बलात्कार केला आणि  तिच्याकडील पैसे, डेबिट कार्ड व दागिनेही काढून घेतले. 

मंगळवारी घडलेला हा भयंकर प्रकार रविवारी उघड झाला. गेल्या मंगळवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास ऑफिस सुटल्यानंतर ही महिला ठाण्यातील घरी जाण्यासाठी काशिमीरा पोलीस ठाण्यासमोरील बसस्थानकाजवळ थांबली होती. एक टॅक्सी येऊन थांबली व टॅक्सीचालकाने ही ओला टॅक्सी असल्याचे तिला सांगितले. कोणतीही खात्री न करता ही महिला टॅक्सीत बसली. कारमध्ये चालकासह आणखी एक जण बसला होता. काही अंतरावर चालक व त्याच्या दोघा साथीदारांनी महिलेला हत्यार्‍याचा धाक दाखवून तिला बळजबरीने वज्रेश्‍वरी येथे नेले. तेथे टॅक्सीचालकाने पीडित महिलेवर बलात्कार केला. तसेच तिच्याकडे रोख रक्कम, दागिने तसेच डेबिट कार्ड लुटले.

या दोघांच्या तावडीतून सुटका करून घेत या महिलेने कारचा नंबरही टिपून घेण्याचे प्रसंगावधान दाखवले. त्यामुळेच काशिमीरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होताच पोलिसांनी टॅक्सीचालक सुरेश पांडुरंग गोसावी (32) व त्याचा साथीदार उमेश जसवंत झाला (33, दोघेही रा. दहिसर) यांना अटक केली. त्यांच्यावर बलात्कार, अपहरण आणि लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.