Sun, May 31, 2020 12:06होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राज्यात स्थिरता यावी, याची काळजी भाजप-सेनेने घ्यावी : शरद पवार

राज्यात स्थिरता यावी, याची काळजी भाजप-सेनेने घ्यावी : शरद पवार

Last Updated: Nov 08 2019 3:45PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन 

राज्यात सत्ता स्थापनेच्या गदारोळादरम्यान रामदास आठवले यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. मुंबईतील सिल्व्हर ओक या बंगल्यावर त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. विद्यमान विधानसभेचा कार्यकाळ काही तासात संपणार असल्याने राज्यात सत्ता स्थापनेसंदर्भात हालचालींना वेग आला आहे. दरम्यान, सध्याच्या राजकीय स्थितीवर सल्ला घेण्यासाठी पवारांना भेटलो, अशी प्रतिक्रिया रामदास आठवले यांनी दिली. 

'भाजप-सेनेत अद्याप एकमत नाही. भाजप आणि सेनेला पवारांनी सल्ला द्यावा,' असे रिपाइं नेते रामदास आठवले म्हणाले. त्यांनी शरद पवार यांच्याबरोबर आपले वैयक्तिक संबंध आहेत. त्यामुळे या राजकीय पेचाविषयी चर्चा केल्याचे सांगितले.

यावेळी शरद पवार म्हणाले, भाजप-सेनेने सरकार बनवावं. राज्याची बिघडलेली स्थिती दुरूस्त व्हावी. सेना-भाजपला जनतेचा जनादेश आहे. जो जनादेश आहे, त्याची अंमलबजावणी करा. जनतेचा कौल सरकारला आहे, त्यांनी सरकार बनवावं. राज्यात स्थिरता यावी. याची काळजी घ्यावी. भाजप-सेनेने समंजसपणा दाखवावा.' 

'काँग्रेस, शिवसेनेचा पाठिंबा घेणार का? असा प्रश्न शरद पवारांनी केला. फेरनिवडणुका होण्याची शक्यता नाही असे संकेत पवारांनी दिले आहेत.