Sat, Jul 04, 2020 07:03होमपेज › Mumbai-Thane-Raigad › नवी मुंबईत पावसाची विश्रांती, खुल्या मैदानातील भाजी मार्केट पुन्हा सुरू

नवी मुंबईत पावसाची विश्रांती, खुल्या मैदानातील भाजी मार्केट पुन्हा सुरू

Last Updated: Jun 05 2020 12:05PM

प्रादिनिधिक फोटोनवी मुंबई: पुढारी वृतसेवा 

नवी मुंबईत गेल्या २४ तासात १२९.२६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. अनेक ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या. तर काही ठिकाणी तुरळक प्रमाणात पाणी साचले होते. मात्र काही वेळेत साचलेल्या पाण्याचा निचरा झाला. पावसाचे प्रमाण कमी झाल्याने एपीएमसीमधील जावक दुपारनंतर वाढण्यास सुरूवात झाली. शुक्रवारी सकाळी पावसाने उसंती घेतल्यानंतर पुन्हा मोकळ्या मैदानात भाजीपाला मार्केट भरण्यास सुरूवात झाली. शिवाय आजपासून सम व विषम तारखेला बाजारपेठ उघडण्यासाठी महापालिकेने परवानगी दिल्याने एका रांगेतील दुकाने उघडली आहेत.

दुकाने उघडण्यासंदर्भात ठाणे पालिकेचा गोंधळ

वाशीमध्ये ७१.२० मिमी तर बेलापूर मध्ये ६२.४० मिमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे नवी मुंबईत एकूण १२९.२६ मिमी पावसाची नोंद झाली.  दिवसभरात पडझड झालेली झाडे, फाद्यांची छटाई करून बंद झालेले मार्ग मोकळे करण्याचे काम महापालिकेने युध्दपातळीवर हाती घेतले होते. नेरूळ, सीवूड, घणसोली परिसरात मोठ्या प्रमाणावर झाडे पडली होती. घणसोलीत एका घरावर झाड पडल्याने घराचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शहरातील वर्दळ मंद झाली होती.  

पण, आता पावसाने थोडा ब्रेक घेतल्याने बँकेत सकाळपासूनच गर्दी दिसू लागली आहे. गेल्या अडीच महिन्यापासून रिक्षा बंद होत्या. पण आता वाहतुकीला परवानगी दिल्याने ओस पडलेल्या रिक्षा स्टँडवर प्रवाशांची गजबज दिसू लागली आहे. बाजारात ग्राहकांची सकाळपासून घरगुती सामान खरेदीसाठी रेलचेल सुरू झाली आहे. मुलांना शाळेची पुस्तके, वह्या खरेदी करण्यासाठी पालकवर्गाने दुकानात फिजिकल डिस्टिसिंग पाळत खरेदी करण्यास सुरूवात केली आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून हार्डवेअर दुकाने बंद असल्याने इलेक्ट्रॉनिक वस्तू बंद अवस्थेत पडून होत्या. शिवाय लागणारे सामान उपलब्ध होत नसल्याने काम बंद पडले होते. आज हार्डवेअरची  दुकाने  उघडल्यानंतर ग्राहकांनी आवश्यक असणारे सामान ,वस्तूंची खरेदी केली. 

सोमवारपासून खासगी कार्यालये, दुकाने उघडणार 

गेल्या ४८ तासात झालेल्या पावसामुळे लहान मुलांसह अनेकांना सर्दी, खोकला, ताप, उलट्या असे प्रकार सुरू झाले आहेत. त्यामुळे महापालिकेच्या सर्व विभागातील फिव्हर क्लिनिकमध्ये स्थानिक नागरिकांनी ताप, खोकल, सर्दी होत असल्याने तपासणीसाठी गर्दी केली आहे. 

 24 तासात झालेला पाऊस 

बेलापूर  62.40 मिमी
नेरूळ 47.40 मिमी
वाशी 71.20 मिमी 
कोपरखैरणे  40.70 मिमी 
ऐरोली  44.20 मिमी 
सरासरी पाऊस 53.18 मिमी 

एकूण पाऊस 129.26 मिमी 

मोरबे धरण क्षेत्रात झालेला पाऊस

पावसाची नोंद  12.60 मिमी 
एकूण पाऊस 68.60 मिमी 
धरणाची पातळी  73.68 मी