Fri, Sep 25, 2020 15:35होमपेज › Mumbai-Thane-Raigad › #Pudhari online poll : उपमुख्यमंत्रिपदासाठी 'यांना' सर्वाधिक पसंती!

#Pudhari online poll : उपमुख्यमंत्रिपदासाठी 'यांना' सर्वाधिक पसंती!

Last Updated: Dec 13 2019 9:45PM

अजित पवार आणि जयंत पाटील (संग्रहित छायाचित्र)पुढारी ऑनलाईन डेस्क
 

प्रदीर्घ चर्वितचर्वणानंतर राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारचे खातेवाटप जाहीर करण्यात आले. शपथविधीनंतर १५ दिवसांपासून रखडलेले महाविकास आघाडी सरकारचे खातेवाटप झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खातेवाटपाची यादी राज्यपालांकडे पाठवून जाहीर केली. 

हिवाळी अधिवेशनानंतर लगेचच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असून त्यात प्रत्येक पक्षाच्या वाट्याला आलेली मंत्रिपदेच त्या त्या पक्षाच्या मंत्र्यांना दिली जाणार आहेत. त्यामुळे विद्यमान मंत्र्यांकडील खात्यांचा भार कमी होणार आहे. 

दरम्यान, खातेवाटपात उपमुख्यमंत्रिपद कुणालाही देण्यात आले नाही. जयंत पाटील यांच्याकडे ही जबाबदारी दिली जाईल, अशी चर्चा होती. मात्र, अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपद असेल तरच मंत्रिमंडळात येतो, अशी आग्रही भूमिका घेतल्याने त्यांच्याकडेच विस्तारानंतर हे पद दिले जाईल, असे सांगण्यात आले.

राष्ट्रवादीमध्ये उपमुख्यमंत्रिपदासाठी विधिमंडळ गटनेते आणि मंत्री जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यामध्ये जोरदार चुरस आहे. याच चुरशीवरून  पुढारी ऑनलाईनने #Pudhari online Facebook poll पोल घेतला. या पोलमध्ये #Pudhari online Facebook poll मध्ये वाचकांनी जयंत पाटील यांना सर्वाधिक पसंती दिली. यामध्ये ६४ टक्के वाचकांनी जयंत पाटील यांच्या पारड्यात मतं टाकली. दुसरीकडे या पदासाठी प्रबळ दावेदार असलेल्या अजित पवार यांच्या पारड्यात ३४ टक्के वाचकांनी मतं टाकली.

गृह आणि नगरविकास ही महत्त्वाची खाती शिवसेनेने आपल्याकडे ठेवली आहेत. गृह खात्याचा कारभार स्वतःकडे ठेवण्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी आपले विश्वासू सहकारी एकनाथ शिंदे यांच्याकडे दिला आहे. नगरविकास खात्याची जबाबदारीही शिंदे यांच्याकडे देण्यात आली आहे. 

राष्ट्रवादीच्या जयंत पाटील यांच्याकडे अर्थ व नियोजन, सहकार, गृहनिर्माण यांसह एकूण पाच खाती देण्यात आली आहेत. राष्ट्रवादीचे दुसरे मंत्री छगन भुजबळ यांना ग्रामविकास आणि जलसंपदा विभागाचे मंत्री करण्यात आले असून काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल आणि ऊर्जा मंत्रालय देण्यात आले आहे.

काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल, शिक्षण या महत्त्वाच्या खात्यांसह पाच खात्यांची जबाबदारी देण्यात आली असून नितीन राऊत यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) आणि  महिला बालविकाससह आठ खात्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. 

 "