Tue, Jun 15, 2021 12:50
मोदींना सर्वांधिक वेळा हरवणारा माणूस शरद पवारांची भेट घेणार! 

Last Updated: Jun 11 2021 8:46AM

शरद पवार
मुंबई; पुढारी ऑनलाईन : पश्चिम बंगालमधे ममता बॅनर्जी आणि तामिळनाडूमधे एमके स्टॅलिन यांना विजय मिळवून देणारे राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेणार आहेत. ही सदिच्छा भेट आहे की राजकीय याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. 

भाजपने बंगालमधे १०० पेक्षा जास्त जागा जिंकल्या तर मी माझं काम सोडेन, अशी प्रतिज्ञा प्रशांत किशोर यांनी केली होती, पण तसं काहीच घडलं नाही. त्यांचं भाकीत खरं ठरूनदेखील त्यांनी विजयाच्या शिखरावर असताना स्ट्रॅटेजी आखण्याच्या कामातून संन्यास घेतला आहे. प्रशांत किशोर आज सकाळी ११ वाजता ते शरद पवारांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक निवासस्थानी भेट घेतील.