Sat, Sep 19, 2020 07:45



होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राज्यात करोनाची दुसरी लाट येऊ देणार नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा निर्धार

राज्यात करोनाची दुसरी लाट येऊ देणार नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा निर्धार

Last Updated: Aug 11 2020 5:43PM




मुंबई : पुढारी ऑनलाईन 

महाराष्ट्रात मुंबईसह सर्व जिल्ह्यांमध्ये साथरोग नियंत्रण रुग्णालये सुरू करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. कोरोना मुक्त झालेल्या काही रुग्णांना बरे झाल्यानंतरही अन्य आजार झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे कोविड १९ नंतरच्या उपचाराची व्यवस्था निर्माण होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यांतील मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधत करोनाच्या उपाययोजनांचा आढावा घेतला. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील कोरोना स्थितीबद्दल त्यांच्याशी चर्चा केली. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, राज्यातील मृत्यू दर कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मुंबईतील धारावी, वरळी येथील स्थिती नियंत्रणात आणल्याबद्दल सर्वंत्र कौतुक होत आहे. मात्र अजुनही लढाई संपली नाही. करोनाची दुसरी लाट महाराष्ट्रात येऊ देणार नाही यासाठी प्रयत्नशील असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
 





 







"